Raj Thackeray News : विधानसभेच्या तयारीला लागलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वेगळ्याच संकटाला समोरे जावे लागत आहेत. 'नवनिर्माण यात्रे'च्या निमित्ताने धाराशिवमध्ये राज ठाकरे आले होते. त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला विरोध करत मराठा आंदोलक राज ठाकरे हे मुक्कामी असलेल्या हाॅटेलमध्ये घुसले होते.
मराठा आंदोलकांमधून राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध केला जातो आहे. राज ठाकरे यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावर राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
शनिवारी(ता.11) राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करतील, असे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे,यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. तर, ओबीसी आंदोलकांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मात्र, राज यांच्या नवनिर्माण यात्रे दरम्यान त्यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून नवनिर्माण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त राज ठाकरे हे सोलापूरमध्ये असताना राज ठाकरे यांनी 'महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य आहे. इथल्या मुलांना शिक्षण आणि रोजगार याच्यासारख्या संधी कोठेच उपलब्ध होणार नाहीत. महाराष्ट्रात सर्वकाही आहे.', असे वक्तव्य केले होते.
'आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत, हे आपल्या मुलांना माहिती नाही. नोकऱ्या महाराष्ट्रात असतात आणि जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये प्रसिद्ध केल्या जातात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला सर्व अंदाज येईल. जरांगे-पाटलांनाही सर्व अंदाज येतील.', असे राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याने संतप्त झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी ठाकरेंना इशारा दिला होता. सोलापूरच्या सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मी जर मनात आणलं असतं.तर यांना धाराशिवच्या बाहेर जाऊ दिलं नसतं'
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.