Prime Minister Narendra Modi, Raj Thackeray And CM Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : 'त्यांनी केलं ते प्रेम, पण आम्ही केलं ते बलात्कार'; बदलत्या भूमिकेवर राज ठाकरे यांचा घणाघात

Raj Thackeray On BJP : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता.30) मुंबईत मेळावा घेतला. यावेळी राज ठाकरे यांनी, पहिल्यांदाच आपल्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उठवणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना, भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवले.

Aslam Shanedivan

Mumbai News : नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महायुतीला मोठं यश मिळाले आहे. पण महाविकास आघाडी आणि मनसेला मोठा धक्का बसला. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता.30) मुंबईत मेळावा घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपसह शिवसेना आणि काँग्रेसवर बदलत्या भूमिकेवरून तोफ डागली. तर त्यांनी घेतलेल्या भूमिका म्हणजे 'त्यांनी केलं ते प्रेम, पण आम्ही केलं तो बलात्कार' का असा सवाल केला आहे.

राज ठाकरे यांनी सतत होणाऱ्या भूमिका बदलांच्या टीकेवर आज सडेतोड उत्तर दिले. त्यांनी राज्यासह देशातील महत्वाच्या नेत्यांनी पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या. मात्र मी कोणत्याही स्वार्थासाठी माझी भूमिका बदलली नाही. जे होत ते स्पष्ट शब्दात सांगितलं. जी भूमिका घेतली ती थेट घेतल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी, सतत भूमिका बदलतो म्हणून टीका करणाऱ्या पत्रकारांचाही समाचार घेतला. तर अशा पत्रकारांचा नेमका किती गाढा अभ्यास असतो असा सवाल केला असून तो एक संशोधनाचा विषय असल्याचं म्हटलं आहे. तर फक्त मीच भूमिका बदलली नाही, तर भाजपने देखील सतत भूमिका बदलल्याचे दाखले राज ठाकरे यांनी यावेळी दिले आहेत.

राज ठाकरे यांनी देशात काँग्रेसला शह देण्यासाठी निर्माण झालेल्या जनसंघातूनच आजच्या भारतीय जनता पक्षाचा उदय झाल्याचे म्हटले आहे. तर याच भाजपने पुढच्या काळात हिंदू आणि हिदुत्वावर भाजपने राजकारण केले. तर अटलबिहारी वाजपेयी अध्यक्ष असताना त्यांनी काँग्रेससाठी आपली भूमिका बदलली असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच राज ठाकरे यांनी यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री फडणवीस एकीकडे ज्या लोकांवर आरोप करतात. त्यांनाच पक्षात आणि मंत्रिमंडळा घेतात असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे नाव घेत, त्यांनी केलेल्या सिंचन घोटाल्याची आठवण करवून दिली. तर याच प्रकरणावरून पंतप्रधानांसह फडणवीस हे त्यांना आत टाकणार असं म्हणत होते. मात्र आत टाकरणार याचा अर्थ मंत्रिमंडळात घेणार असा होता हे आत्ताच कळाल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांनी फक्त आपलीच भूमिका बदलते असे नाही तर भाजपने महाराष्ट्रात कशी भूमिका बदलली याचा दाखला देत कशा पद्धतीने पक्षात नेत्यांना घेतलं याची यादीच वाचून दाखवली. हिंमत बिसवा शर्मा हे भ्रष्टाचाराचं मूर्तीमंत प्रतिक असल्याचा दावा भाजपने केला होता. त्यानंतर त्यांना पक्षात घेत मंत्रिमंडळात समावेश केला. 2021 मध्ये मुख्यमंत्री याच भाजपने केलं. भाजपने आपली भूमिका बदलली नाही. फडणवीस आणि किरीड सौमय्या यांनी आरोप करावेत आणि आपण जेलमध्ये जावं म्हणून लोक देव पाण्यात ठेवतात, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज्यातही असेच भाजपने केलं असून काँग्रेसच्या ज्या अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले त्यांनाच पक्षात घेतलं. तर पुढील आठ दिवसात राज्यसभेवर देखील पाठवलं, पण भूमिका बदलली नाही. असेच राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमधून भाजपमध्ये आले जे आत मंत्रिमंडळात आहेत. तर कृपाशंकर सिंग, बबनराव पाचपुते, अजित पवार, अशोक चव्हाण हेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांवर आरोप केले जे आत भाजपबरोबर असल्याचा दावा देखील राज ठाकरे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT