Rajesh Tope
Rajesh Tope sarkarnama
महाराष्ट्र

आरोग्यमंत्री टोपेंनी मागितली माफी ; 'न्यासा'वर फोडलं खापर

सरकारनामा ब्युरो

पुणे : आरोग्य विभागाची आज (शनिवारी) होणारी परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षा का पुढे ढकलण्यात आली याचं कारण आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. टोपेंनी परिक्षार्थींची माफीही मागितली.

''न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा रद्द करावी लागली आणि यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला,'' अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिक्षार्थींची माफीही मागितली आहे.

परीक्षांची तारीख येत्या आठ ते दहा दिवसांत ठरवून नवीन तारीख जाहीर केली जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. परीक्षेची जबाबदारी न्यासाची असताना देखील त्यांना टार्गेट देऊनही संस्थेकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली नाही. सेलूतील काही परीक्षा केंद्राना भेटी दिल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गरजेत त्रुटी आढळल्याचे टोपे यांनी सांगितलं. आरोग्य विभागातील गट क आणि ड मधील रिक्त असलेल्या 6 हजार 200 जागांसाठी या परीक्षा होणार होत्या. मात्र, न्यासाकडे परीक्षेची सर्व जबाबदारी असताना न्यासाला जबाबदारी पार पाडण्यात अकार्यक्षम ठरली, असा आरोप टोपे यांनी यावेळी केली.

विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचत असताना काल रात्री आरोग्य विभागाने परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक विद्यार्थी एसटी, खासगी बसने परीक्षा केंद्रावर पोहचत असताना हा मेसेज आल्याने गोंधळ उडाला. बाहेरील गावाहून परीक्षा केंद्रावर पोहचत असलेले अने..म्हणून मी सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले : गडकरीक विद्यार्थी परत आपल्या गावी गेले.

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी २५ सप्टेंबर २०२१ रोजी आणि गट ड संवर्गातील पदासाठी २६ सप्टेंबर २०२१ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार होती. या परीक्षेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसापूर्वी घेतला होता.

दोन दिवसापूर्वी याबाबत सह्याद्री विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक डॉ. साधना तायडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान सहाय्यक संचालक डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते. पण ऐनवेळी प्रशासनाने घातलेल्या गोंधळामुळे नुकसान झाल्याने विद्यार्थांनी 'सरकारनामा'ला सांगितले. आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. सातत्याने उद्भवणाऱ्या तांत्रिक चुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. काही परीक्षार्थी आपापल्या परीक्षा केंद्रावर जाऊन पोहोचले आहेत. असे असताना ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता चांगलाच गोंधळ उडाला आहे. परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला.

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT