Jayant Patil Uddhav Thackeray Sharad Pawar : sarkarnama
महाराष्ट्र

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, जयंत पाटील उद्धव ठाकरेंशी बोलले अन्..., खासदाराने आतली बातमी सांगितली

Jayant Patil Uddhav Thackeray Sharad Pawar : राज्यसभा निवडणूक 16 मार्चला होणार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार यावरून सध्या चर्चा सुरू आहे.

Roshan More

Sanjay Raut News : राज्यसभेची निवडणूक 16 मार्चला होणार आहे. महाविकास आघाडीमधून कोण लढणार याचे नाव अजून निश्चित झालेले नाही. एका जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहेत. शरद पवार ही निवडणूक लढणार की नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवर शरद पवार लढण्याच इच्छुक असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले, 'जयंत पाटील हे काल उद्धव ठाकरेंशी बोलले. शरद पवार हे इच्छुक आहेत म्हणूनच ते उद्धव ठाकरेंशी बोलतायेत, काँग्रेसच्या नेत्यांशी बोलतायेत. जो निर्णय होईल तो एक मतानेच होईल. महाविकास आघाडी म्हणून होईल.'

राष्ट्रवादीच्या विलीनकरणाच्या चर्चांमुळे शरद पवार हे एनडीएसोबत जाणार का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, मला जेवढे राजकारण समजते त्यानुसार शरद पवार हे कधीच एनडीएसोबत जाणार नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र बसून उमेदवारी बाबत निर्णय घेतील.

'तीन पक्ष एकमेकांशी बोलतातयेत. ती बोलणी संपत नाहीत. प्रत्येकची इच्छा आहे त्यामुळे तीन तिघाडा आहे. महायुतीत देखील तीन चाकी रिक्षा आहेत. या प्रकारच्या गोष्टी निवडणुकीत होत असतात. चर्चा शेवटच्या मिनीटापर्यंत सुरूच राहिलं. काँग्रेसपक्षामध्ये कोण इच्छुक आहेत हे मला माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त शरद पवार इच्छुक आहेत.', असे देखील त्यांनी सांगितले.

राजन विचारे उद्धव ठाकरेंना भेटले

प्रत्येक जण दावा सांगत असतो. कारण प्रत्येक पक्षाचा सदस्य निवृत्त झाला आहे. राज्यसभेमध्ये आपला सदस्य असावा असे प्रत्येकाला वाटते. शिवसेनेला जास्त वाटते कारण शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहेत. आणि किमान आमचे दोन जण राज्यसभेत असावेत असे पक्षप्रमुखांना वाटते. राजन विचारे यांनी पक्षप्रमुखांना भेटून संधी मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे देखील राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT