Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या नावावर एकमत होण्याची चिन्हे आहेत. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देखील सुप्रिया सुळे यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत शरद पवारांच्या नावाबाबत एकमत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचा एक गट अस्वस्थ आहे. शरद पवार हे एनडीएसोबत जातील याची भीती या गटाला असल्याची माहिती आहे. म्हणूनच काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून आग्रही आहेत.
काँग्रेसला राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी दोन जागांची आवश्यकता आहे. तेलंगणामधून त्यांची एक जागा विजयी होत आहे. शरद पवारांना पाठींबा दिल्याने त्यांचे विरोधी पक्षनेते पद कायम राहिली. मात्र, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणाची चर्चांमुळे शरद पवारांनी इंडिया आघाडीची साथ सोडली तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एका जागेसाठी आग्रह धरला जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, शरद पवार हे पु्न्हा राज्यसभेवर जाण्याबाबत इच्छुक आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र चर्चा करू. दरम्यान, मला जेवढे कळते त्यावरून शरद पवार हे कधीच एनडीएसोबत जाणार नाहीत, असे देखील राऊत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.