Ahilyanagar district politics in focus as Ram Shinde and voters travelling outside Maharashtra draw attention. sarkarnama
महाराष्ट्र

Ram Shinde Politics : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत 'रिसॉर्ट' पाॅलिटिक्स! मतदार राज्याबाहेर रवाना; राम शिंदेंनी विरोधकांची धाकधूक वाढवली!

Ram Shinde Ahilyanagar Politics : सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीती मतदारांना सहलीवर रवाना करतानाचे फोटो ट्विट केले आहे. एकुण 60 जण रवाना होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Roshan More

Ram Shinde : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके निवडणूक ही बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू होत्या. यामध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदें यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मात्र, राम शिंदेंनी मोठा डाव टाकत निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

शिंदे यानी ट्विट करत स्पष्ट केले की, निवडणुकीच्या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील मतदारांना सहलीसाठी राज्याबाहेर रवाना करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.

कर्जत तालुक्यात 75 मतदार आहेत. त्यातील 45 मतदार सहलीसाठी रवाना झाला. तसेच लवकरच १५ मतदार जॉईन होणार असून एकूण ६० मतदार सहलीला जाणार, असल्याची माहिती देखील शिंदे यांनी दिली आहे.

शिंदे-लंकेंमध्ये बंद दाराआड चर्चा

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांची बंद दाराआड चर्चा झाली.एकीकडे बँक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू असताना या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

विखेंच्या विरोधात पॅनल?

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या पॅनलची मोट बांधली आहे. आता सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांच्या भेटीमुळे निवडणूक बिनविरोध होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, माजी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात विखे-शिेंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा झाली का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT