Ramdas Athawale Sarkarnama
महाराष्ट्र

Ramdas Athawale : मुख्यमंत्रिपदाबाबत रामदास आठवलेंनी भाजपला दिला सल्ला; म्हणाले ''एकनाथ शिंदे जर...''

Ramdas Athawale advises BJP on CM post and Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवले असून, आता मुख्यमंत्रिपदाचा होणे बाकी आहे.

Mayur Ratnaparkhe

Mumbai News: विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवले आहे. मात्र आता मुख्यमंत्री कोण? याबाबत निर्णय होणे बाकी आहे. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सर्वाधिक आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही समावेश दिसत आहे.

तर दुसरीकडे अद्यापही कुठंतरी शिवसेनेचे आमदार हे एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री केलं पाहीजे, असं म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्री पदावरून सध्यातरी विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. आता यावर महायुतीमधील मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांच्याही(Ajit Pawar) नाव काही आमदारांकडून घेतलं जात आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबाबत सल्ला दिला आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

रामदास आठवले म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री पद सोडून केंद्रात आलं पाहीजे. तसेच त्यांनी असंही म्हटलं की, जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरील दावा सोडत नाहीत, तर भाजपने(BJP) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी मिळून सरकार बनवलं पाहीजे. आठवलेंनी हेही म्हटले की एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे चांगले काम केले. परंतु आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच झाले पाहीजेत.

दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही दिला आहे आणि ते आता कार्यावाहक मुख्यमंत्र्याची भूमिका निभावणार आहेत. याशिवाय महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज किंवा उद्यापर्यंत दिल्लीतील भाजपचे पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करण्याची चिन्हं आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं(Devendra Fadnavis) नाव सर्वात आघाडीवर आहे.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक झाली आणि त्यामध्ये अजित पवारांची नेतेपदी निवड झाली. तसेच पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली. तर दुसरीकडे शिवसेना आमदारांनीही एकनाथ शिंदे यांना आपला नेता म्हणून निवडलं. यावेळी प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की, सर्व आमदारांची इच्छा आहे की, एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT