Ramdas Athawale assets : केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या कोट्यातून उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. २०१४ पासून ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे मागील १२ वर्षांत त्यांच्या संपत्तीमध्ये नेमकी किती वाढ झाली, याची उत्सुकता अनेकांना आहे.
२०१४ मधील संपत्ती
राज्यसभेच्या २०१४ च्या निवडणुकीवेळी आठवले यांनी सादर केलेल्या शपथपत्रामध्ये संपत्तीबाबत दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे ४२ हजार ३४५ रुपये आणि पत्नीकडे ४५ हजार ६ रुपये रोख रक्कम होती. तसेच ठेव, विमा, पोस्टासह इतर ठिकाणी लाखो रुपयांची गुंतवणूक होती. त्यावेळी आठवले यांच्याकडे २ लाख १० हजार रुपये किंमतीचे तर त्यांच्या पत्नीकडे ६ लाख ५७ हजार रुपयांचे, आईकडे १ लाख १६ हजार ८०० रुपयांचे आणि मुलाकडे २ लाख ९२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते.
आठवले कुटुंबाकडे एकूण चल संपत्ती ५७ लाख ६० हजार ३३० रुपये एवढी होती. तर स्थावर संपत्तीमध्ये सांगलीमध्ये शेतजमीन, मुंबईत फ्लॅट आदी एकत्रित ३ कोटी ८ लाख ९९ हजार २७० एवढी संपत्ती होती. पत्नीच्या नावे २१ लाख ४० हजार ५०० रुपयांचे कर्जही होते. एकत्रित स्थावर आणि चल संपत्ती ३ कोटी ६६ लाख ५९ हजार ६०० रुपये एवढी होती.
२०२६ मधील संपत्ती
यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आठवले यांनी जोडलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्या नावावर ८४ लाख २८ हजार ९९५ रुपये आणि पत्नीच्या नावे २ कोटी ५९ लाख ७८ हजार २१९ रुपये चल संपत्ती आहे. त्यामध्ये आठवले यांच्याकडे ११ लाख ७६ हजार १२ रुपये किंमतीचे ७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पत्नीकडे ६२ लाख २३ हजार ६३ रुपये किंमतीचे ३८१ ग्रॅम वजनाचे दागिने आहेत.
स्थावर मालमत्तेमध्ये आठवले यांच्या नावे सांगलीत शेतजमीन आहे. त्यांच्या नावावर एकूण स्थावर संपत्ती ५० लाख ७७ हजार ९०५ रुपये तर पत्नीच्या नावे ५ कोटी ९६ लाख ८१ हजार ७६३ रुपये अशी एकूण ६ कोटी ४७ लाख ५९ हजार ६६८ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. चल आणि स्थावर अशी एकत्रित संपत्ती ९ कोटी ९१ लाख ६६ हजार ८८२ रुपये एवढी आहे. पत्नीच्या नावे ९६ लाख रुपयांचे कर्जही आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.