Mumbai News : महाराष्ट्रात महायुतीचा घटकपक्ष म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणुकीत राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. त्यातील फक्त एका जागेवर पक्षाला विजय मिळवता आला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रायगडमधून सुनील तटकरे यांचा विजय झाला होता. मात्र,त्यांना केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळू शकलं नव्हतं.
आता मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं केंद्रात वजन वाढणार असल्याची माहिती केंद्रात सलग तीन वेळा मंत्रिपद भूषवलेल्या रामदास आठवलेंनी यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या पक्षाला केंद्रात एक मंत्रिपद मिळेल,असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महायुतीकडून एकही जागा मिळाली नव्हती मात्र, येत्या विधानसभेमध्ये आठ ते दहा जागा आम्ही घेणार असून, त्या जिंकण्यासाठी आमचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत असे आठवले यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, केंद्रात मंत्रिपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला देण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे ते महायुतीमध्ये नाराज असण्याचे काही कारण नाही. महायुती बळकट असून, येत्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला निश्चित जनाधार मिळेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत चुकीचा प्रचार केल्याने त्याचा फटका महायुतीला बसला, हे खरे आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण जनतेपर्यंत जाऊन १७० ते १८० जागा निश्चित जिंकू, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी व्यक्त केला.
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात संविधानाबाबत चुकीचा प्रचार केला त्याचा फटका महायुतीला बसला, आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधील सर्व पक्ष जनतेपर्यंत जाऊन 170 ते 180 जागा निश्चित जिंकू, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.