Pratap sarnaik, omrajenimbalkar, ranajagjitsinh patil  Sarkarnama
महाराष्ट्र

Dharashiv Politics : कट्टर राजकीय वैरी ओम राजेनिंबळकर-राणाजगजितसिंह एकाच गाडी बसले, म्हणाले, 'तोंड बघायची पण इच्छा नव्हती पण...'

Ranajagjitsinh Patil Omraje Nimbalkar : राजेनिंबाळकर आणि राणाजगजितसिंह पाटील यांचे राजकीय वैर धाराशिवच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. मात्र, हे दोन्ही कट्टर विरोधक एकाच गाडीत एकत्रित बसल्याचे चित्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात दिसले.

Roshan More

Omraje Nimbalkar News : धाराशिवसह महाराष्ट्राच्या राजकारणात ओम राजेनिंबाळकर आणि राणाजगजितसिंह पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. समोरासमोर आल्यानंतर ते एकमेकांना आव्हान देत असतात. मात्र, हेच राजकीय वैरी एकाच गाडीत बसल्याचे चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात दिसले.

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री बुधवारी धाराशिवच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाडीत राणाजगजितसिंह, ओमराजे आणि प्रताप सरनाईक हे एकत्रित बसले होते.

ओमराजे निंबाळकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 'त्याचे (राणाजगजितसिंह ) तोंड पाहण्याचीही इच्छा नसते. मात्र, मुख्यमंत्री तेथे आले होते. आपल्या भागातील ज्या अडचणी आहेत, व्यथा आहेत, आपण ज्या लोकांचे नेतृत्व करतोय त्या लोकांची वस्तुस्थिती त्या लोकांचे दु:ख राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणे गरजेचे होते. गाडीत बसून मी त्यांना तेवढीच विनंती केली.'

अंबादास दानवेंचा टोला

मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसणे टाळण्या प्रयत्न ओमराजे करताना एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत. दरम्यान,यावरून अंबादास दानवे यांनी ओमराजेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले, दोन-चार ट्रान्सफॉर्मरच्या बदल्यात ३.२९ लाखांचे मताधिक्य सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधले, की असाच तुसडेपणा नशिबाला येतो. ठाकरेंनी केलेले जिवापाड प्रेम पचले नाही तुम्हाला.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका

अंबादास दानवे यांनी मुख्मयंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, मुख्यमंत्री फडणवीस यांचा कालचा मराठवाडा दौरा म्हणजे जणू 'मेरी आवाज सुनो' हा चित्रपटच होता! शेतकऱ्यांचा आवाज ऐकायचा नाही आणि आपलंच कीर्तन रेटायचं, अशी या चित्रपटातील नायकाची कथा होती. ताफ्यातील एक आघाडीचा व्हिलन शेतकऱ्यांना धक्के मारून लोटत सुटला होता; तर दुसऱ्या एकाला हे पाहून दया येत असली, तरी तो दात काढलेल्या वाघासारखा अपमान गिळून मुकाट उभा होता.

​या चित्रपटात लोकांना मंत्रालयात चक्रव्यूह रचणारा 'अभिमन्यू'ही दिसला आणि तलवार काढून घेतलेला 'सरनाईक'ही अधूनमधून झळकताना पाहता आला. ​पण चित्रपटातून एक मुख्य डायलॉग मात्र गायब होता.. "मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ बघितला, पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही!"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT