Ranjitsinh Mohite Patil Vijaysinh Mohite Patil meet Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Mohite Patil Meet CM Fadnavis : विजयदादा अन् रणजितदादा मोहिते पाटील CM फडणवीसांच्या भेटीला; सोलापूरमध्ये नव्या समीकरणांची नांदी?

Solapur Politics Ranjitsinh Mohite Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुंबईत घेतल्याने नवी समीकरणे जुळणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mohite Patil Poitics : सोलापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट झाली.

सह्याद्री अतिथिगृहावर भेट झाल्याची माहिती आहे. सोलापूर महापालिकेत भाजपने मिळवलेला भव्य विजय आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे भेटीमुळे सोलापूरात नवे समीकरण तयार होणार का? याची चर्चा आहे.

नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वीच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नव्हती. अखेर मोहिते पिता-पुत्राचा शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत भेटीचा मुहूर्त जुळून आला.

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विषयी भाजपमध्ये काहीशी नाराजी आहे. लोकसभेला मोहित पाटील परिवार भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात होता. तर, माळशिरसमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात होता. तेव्हापासून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर भाजप उमेदवाराचा पराभव केल्याचे खापर फोडले जात होते. ते नगरपरिषदेच्या प्रचारात देखील दिसले नाहीत.

आमदारकीची मुदत मे पर्यंत

रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांची मुदत 13 मे 2026 रोजी संपत आहे. मार्च-एप्रिलमध्ये राज्यातील विधानपरिषदेच्या रिक्त जागांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT