Raosaheb Danve Sarkarnama
महाराष्ट्र

Raosaheb Danve : युपीत तुमचे दोनच आमदार, मग काॅंग्रेसचा पंतप्रधान कसा होणार?

शिवसेना, काँग्रेसचा सत्तेपुरता उपयोग करून घेऊन या दोघांना संपविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यानंतर राज्यात एकहाती सत्ता आणण्याची राष्टवादीची चाल आहे. (Raosaheb Danve)

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पंतप्रधान होण्याचा मार्ग हा उत्तरप्रदेशातून जातो. मात्र, याच राज्यात काँग्रेसचे ४०३ पैकी दोनच आमदार आहेत. मग २०२४ ला काँग्रेसचा पंतप्रधान कसा होणार, असा खोचक प्रश्न केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना विचारला. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांत समन्वय नाही, निधीत असमानता आहे, याबाबी काँग्रेसला कळून चुकल्या असल्याने त्यांच्यात नाराजी असल्याचेही दानवे म्हणाले. (Maharashtra)

भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दानवे प्रदेश कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, “देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात. त्यामुळे इतरांनी काही बोलून उपयोग होणार नाही. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेतील आमदाराच नाराज आहेत.

शिवसेना, काँग्रेसचा सत्तेपुरता उपयोग करून घेऊन या दोघांना संपविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यानंतर राज्यात एकहाती सत्ता आणण्याची राष्टवादीची चाल आहे. या तिन्ही पक्षात एकाच पक्षाला म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांनाच ७० टक्के निधी मिळत आहे. त्यावर शिवसेनाही नाराज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करण्याच्या मागणीवरही दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'हे प्रयोग अनेकदा करून झाले आहेत. त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. त्याचे पुढे काय होते, हे सगळ्यानाच ठाऊक आहे, असेही दानवे यांनी सांगितले. शिवसेनेची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT