Ravikant Tupkar Sarkarnama
महाराष्ट्र

Ravikant Tupkar Big Announcement: 'स्वाभिमानी'तून हकालपट्टी; तुपकरांची नव्या पक्षाची घोषणा, निवडणुकीची दिशाही ठरली

Deepak Kulkarni

Pune News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहून राजू शेट्टींशीच वैर घेतलेल्या, बुलढाण्यातून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवलेल्या रविकांत तुपकर यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर रविकांत तुपकर आणि शेट्टी यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. आता तुपकर यांनी वेगळी वाट पकडत मोठी घोषणा केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी झाल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी लवकरच पुढील दिशा ठरवणार असल्याचे जाहीर केले होते. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात घडामोडींना वेग आला आहे.बुधवारी समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर तुपकर यांनी त्यांची नवी राजकीय दिशा ठरवली असून नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. तुपकरांनी नव्या पक्षाची घोषणा करतानाच त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष 25 जागा लढवणार असल्याचेही जाहीर केले आहे.त्यात बुलढाणा जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटेनत इतकी वर्ष काम केल्यानंतर आता रविकांत तुपकर यांनी आपली राजकीय दिशा बदलली आहे. त्यांनी नव्या पक्षाची घोषणा करतानाच राजू शेट्टींवर टीकेची झोड उठवली होती.ते म्हणाले,माझा असा काय गुन्हा होता की, माझ्यावर कारवाई झाली? माझ्यावर कारवाई केल्यानंतर राजू शेट्टींना (Raju Shetti) सुखाची झोप लागली असेल.त्यांच्या वाटेतला काटा दूर झाला, असं त्यांना आता वाटत असा टोलाही तुपकर यांनी यावेळी लगावला.

तुपकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात एका तालुक्यापुरती स्वाभिमानी शेतकरी संघटना होती. पण आम्ही तिला राज्यात नेलं.मात्र, स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी त्यांना वाटलं की, ते कारवाई करतात. त्यांनी आधी सदाभाऊ खोत यांना काढलं, नंतर देवेंद्र भुयार यांना काढलं.आता आज माझा नंबर लागला.छोट्या पक्षांचे नेते खूप असुरक्षित असल्याचे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.

रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी संघटनेची या नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर लवकरच राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.आगामी विधानसभा निवडणूक आमचा पक्ष राज्यातील तिसरी आघाडी म्हणून लढवणार असल्याचं विधानही त्यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT