Farmer-priest families cultivating Devasthan Inam lands receive relief under Maharashtra law. sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Government : सरकारचा देवस्थान इनाम जमिनींबाबत ऐतिहासिक निर्णय, शेतकरी, कुळांना दिलासा!

Devasthan Inam Abolition Act : देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना, कुळांना तसेच पुजाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या जमिनी त्यांच्या मालकीच्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra News: देवस्थानच्या जमीनी कसणाऱ्या शेतकरी आणि पुजाऱ्यांना मोठा दिलासा 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन' कायद्याद्वारे मिळणार आहे. या कायद्याने ते कसत असलेली जमीन त्यांच्या मालकीची होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात या संदर्भात विधेयक मांडले जाणार आहे. त्यामुळे तब्बल साडेचार लाख हेक्टरहून अधिक जमीन मुक्त केली जाणार आहे.

राजे, महाराजे यांच्या काळापासून देवस्थानाला जमीन दान देण्यात आल्या होत्या. या जमिनी शेतकरी, कुळ कसत होत्या. मात्र, या जमिनीची मालकी देवस्थानाच्या मालकीची होती. शेतकरी अनेक वर्षांपासून या जमिनी कसत असले तरी त्यांची नोंद कुळ म्हणून केली जात होती. दरम्यान, आता देवस्थानच्या इनाम जमिनी निर्मूलन कायद्याद्वारे या जमिनी कुळाच्या नावे होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

गावठाणातील जमिनी घरासाठी मोफत दिल्या जातील. तर शेतजमिनींसाठी रेडीरेकनरप्रमाणे शुल्क भरावे लागणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकरी आणि पुजारी यांच्या जमिनीचा मालकी हक्क निश्चित होणार आहे.

...ती जमीन सरकारजमा होणार

देवस्थानची जमिनी वहिवाटदारांचे नावे भोगवटादार वर्ग एकमध्ये समाजविष्ट केले जाणार आहे. मात्र, ही जमीन नावे करातना कमाल जमीन धारणा कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे मर्यादे पेक्षा अधिक जमीन ही सरकार जमा होणार आहे. तसेच या कायद्यानुसार देवस्थानच्या जमिनीवरील बेकादेशीर कब्जा आणि हस्तांतरण काढून घेण्याची देखील तरदूत करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT