Rajesh Tope alerted about Omicron infection
Rajesh Tope alerted about Omicron infection Sarkarnama
महाराष्ट्र

राज्यात ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊन अटळ?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भारतात ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) चार रुग्णांची नोंद झाल्यानंतर आता पुन्हा देशाची चिंता वाढली आहे. कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही (Maharashtra) ओमिक्रॉनचे पहिले प्रकरण समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेत गेलेला एक व्यक्ती दुबईमार्गे भारतात आला. कोरोना चाचणी केल्यानंतर त्या व्यक्तीला Omicron variant ची लागण झाल्याचे आढळून आले.

हा ३३ वर्षीय तरुण डोंबिवलीचा रहिवासी आहे. गेल्या महिन्यातच त्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि आता त्याला ओमिक्रॉनचीही लागण झाली आहे. भारतातील Omicronची लागण झालेला हा चौथा रुग्ण आहे. सध्या या व्यक्तीला कल्याण डोंबिवली कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, देशात ओमिक्रॉन व्हेरीयंटचा रुग्ण आढळल्यामुळे राज्याचीही चिंता वाढली आहे. पहिल्या आणि दूसऱ्या लाटेमुळे देशाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. एकीकडे कोरोनामुळे लोक आपला जीव गमावत होते, तर दूसरीकडे लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाला मोठा आर्थिक फटकाही सहन कारावा लागत होता. त्यामुळे आता ओमिक्रॉनमुळे तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

या सर्व चिंतेवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी उत्तर दिले आहे. ''कर्नाटकात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे आणखी काही रुग्ण सापडले. अर्थात, या सर्वांमुळे आणखी संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल. काळजी न घेतल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉनची होऊ शकते. ओमिक्रॉन धोकादायक नाही, परंतु त्याचा संसर्ग झपाट्याने पसरतो, त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून जो अहवाल येईल त्याप्रमाणे महाराष्ट्रात आयसीएमआर पुढील कारवाई करेल. राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेला हा पहिला रुग्ण आहे. मात्र जनतेने घाबरुन न जाता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. लस घेतली नसेल तर सर्वात आधी लस घ्यावी. सध्या घाबरुन न जाता काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना नियामांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT