Rohit Pawar press Conference on Ajit Pawar Plane crash  Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या विमान अपघातातील राजकीय कनेक्शन : केंद्रीय मंत्र्यापासून भाजपच्या माजी खासदाराच्या कुटुंबापर्यंत सांगितले संबंध

Rohit Pawar press Conference on Ajit Pawar Plane crash : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात मोठे राजकीय कनेक्शन समोर आल्याचा दावा. केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या माजी खासदारांच्या कुटुंबाशी संबंध असल्याचे आरोप. संपूर्ण माहिती वाचा.

Rashmi Mane

अजितदादांच्या विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला की त्यामागे काही राजकीय किंवा आर्थिक हितसंबंध आहेत, यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात महत्त्वाचे राजकीय संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी काही कागदपत्रे आणि माहिती सादर करत संपूर्ण घटनेची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यांच्या मते, अपघाताशी संबंधित काही व्यक्ती आणि कंपन्यांचे सत्ताधारी नेत्यांशी संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

रोहित पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी श्वेता सिंह यांचे नाव घेतले. श्वेता सिंह या दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. त्यांचा विवाह राहुल महाजन यांच्याशी झाला होता, मात्र काही काळानंतर दोघे विभक्त झाले. तसेच श्वेता सिंह या विमान वाहतूक महासंचालनालयाशी संबंधित कामकाजात कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला. या सर्व संबंधांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि अपघाताशी त्यांचा काही अप्रत्यक्ष संबंध आहे का, हे तपासावे, अशी मागणी करण्यात आली.

दुसरा मुद्दा व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या मुला संदर्भात उपस्थित करण्यात आला. रोहित सिंग हा केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांचा मुलगा असल्याचे सांगितले गेले. सुमारे 1 ते 2 वर्षांपूर्वी राजस्थानमधील एका हॉटेलमध्ये त्याचा विवाह सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमाला सत्तेतील काही लोक, महाराष्ट्रातील माजी मंत्री, आंध्रप्रदेशच्या टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते तिकडे गेले होते, असा दावा करण्यात आला.

तसेच आंध्र प्रदेशातील तेलुगू देशम पार्टी या पक्षाचे काही वरिष्ठ नेते त्या लग्नाला उपस्थित होते, असेही त्यांनी म्हटले. पुढे त्यांनी आरोप केला की, जेव्हा व्हीएसआर कंपनीविरुद्ध कारवाईची वेळ येते, तेव्हा काही केंद्रीय स्तरावरील मंत्री त्या कंपनीला संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात. अपघातानंतर संबंधित व्यक्ती परदेशात गेल्याचाही दावा करण्यात आला.

व्हीएसआर कंपनीच्या कार्यपद्धतीशी संबंधित होता. अपघातानंतरही काही नेते आणि मंत्री या कंपनीच्या सेवांचा वापर करत असल्याचे सांगण्यात आले. जर कंपनीवर संशय घेतला जात असेल, तर तिच्यावर तातडीने कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. हैदराबादमधील काही प्रभावशाली व्यक्तींचे कंपनीच्या मालकाशी निकट संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला.

याशिवाय, अपघातग्रस्त पायलटवर कोणताही दबाव होता का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तो अनेक वर्ष बेरोजगार होता आणि कमी मानधनावर त्याची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा अपघात केवळ तांत्रिक त्रुटी नसून त्यामागे राजकीय आणि आर्थिक साखळी असू शकते, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT