Ajit Pawar, Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : लाडक्या अधिकाऱ्याला CM फडणवीसांनी दिली मोठी जबाबदारी, अजितदादांच्या अर्थखात्यात घुसखोरी? शरद पवारांच्या आमदाराने काडी टाकली

Rohit Pawar alleges interference in Ajit Pawar’s finance department : गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदेसाहेबांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली आता अजितदादांचा नंबर आहे, असे रोहित पवार म्हणाले.

Roshan More

Rohit Pawar Vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यापासून आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना आपल्या टीममध्ये संधी देत महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली आहे. नुकतेच त्यांनी निवृत्त आएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून केली. परदेशी हे धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात.

परदेशी यांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्यात घुसखोरी असल्याची टीका केली आहे.

रोहित पवार यांनी या विषयी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केलेली आहे. यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सर्वच प्रशासकीय निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील.'

'गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदेसाहेबांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली आता अजितदादांचा नंबर आहे.विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अपत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला असून मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्तीचा भाग आहे.', असा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे.

कार्यपद्धतीत बदल हिताचे...

लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे महाराष्ट्राच्या हिताचे राहील, असा अप्रत्यक्ष सल्ला देखील रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

मित्रपक्ष तात्पुरती सोय

रोहित पवार यांनी भाजपवर टीका करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ ‘तात्पुरती सोय' एवढाच अर्थ आहे. त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही हे मात्र मित्रपक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT