नरेश अरोरा यांच्या कंत्राटाच्या मुद्द्यावरून अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात तीव्र मतभेद झाले होते, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अरोरा यांच्या शेकडो कोटींच्या कंत्राटाला रद्द करण्याच्या प्रस्तावामुळे हा वाद निर्माण झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. याआधीच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला होता.
रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, एका पॉलिटिकल कन्सल्टंटबाबत महत्त्वाची चर्चा झाली होती. योगायोगाने त्या कन्सल्टंटने गेल्या काही महिन्यांत स्वतःचे विमान खरेदी केले होते. संबंधित व्यक्तीचे मोठ्या रकमेचे कंत्राट रद्द करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. मात्र या निर्णयाला काही नेत्यांचा विरोध होता. याच मुद्द्यावरून बैठकीत तीव्र वादावादी झाली. त्या वेळी सुनील तटकरे देखील उपस्थित होते, असे पवारांनी सांगितले.
या वादामुळेच अजित पवारांना कार्यक्रमासाठी उशीर झाला, असा दावा त्यांनी केला. उशिर झाल्याने ते नियोजितप्रमाणे गाडीने न जाता विमानाने प्रवास करावा लागला आणि 28 तारखेला दुर्दैवी घटना घडली, असे त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर 27 आणि 28 तारखेतील घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, नरेश अरोरा यांच्या कन्सल्टंटचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते. अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत त्यांना सुनावले. काही नेत्यांची भूमिका अशी होती की, अरोरा यांचे कंत्राट कायम ठेवले जावे आणि त्यांना आर्थिक देयके दिली जावीत. मात्र अजित पवार यांचा त्याला स्पष्ट विरोध होता. त्यामुळे मतभेद अधिक तीव्र झाले.
याशिवाय, प्रमोद हिंदूराव यांनी स्वतः सांगितल्याचा उल्लेख करत रोहित पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांचा फोन आल्याने एका फाईलसंबंधी चर्चा आणि स्वाक्षरीस वेळ लागला. त्यामुळे प्रवासाच्या नियोजनात बदल झाला. अजित पवार यांच्या समर्थनार्थ काही पदाधिकारी पुढे येत असल्याचे पाहून समाधान वाटते, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या 4 महिन्यांत काही मोजके आमदार आणि पदाधिकारीच त्यांच्या बाजूने बोलताना दिसत होते, तर मोठ्या पातळीवरील नेते प्रचारात सक्रिय नव्हते, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.