Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'पुढील महिन्यात मोठा धमाका, भाजपकडून मित्रपक्षाची शिकार...'; रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंकडे इशारा?

Rohit Pawar BJP Eknath Shinde : पुढील महिन्यात सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Roshan More

Rohit Pawar News : महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे, असे सांगत भाजपकडून सत्तेतील एका मित्र पक्षाची शिकार केली जाणार असल्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे.'

महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे टार्गेट?

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचे अथवा नेत्याचे नाव घेतलेले नाही. मात्र, त्यांचा इशारा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ऑपरेशन टायगर करत शिंदे आपल्या पक्षाची ताकद वाढवू पाहत आहेत. ऑपरेशन टायगरसंदर्भातील बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्वःता एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. मात्र, ठाकरेंची शिवसेना फोडून खासदारांची संख्या वाढवत सत्तेत अधिक वाढण्याचा प्लॅन शिंदेंच्या शिवसेनेकडून असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT