Rohit Patil sarkarnama
महाराष्ट्र

विरोधकांना धोबीपछाड देणाऱ्या रोहित पाटलांना 'राष्ट्रवादी' देणार रिटर्न गिफ्ट

राष्ट्रवादी कॉग्रेस युवक अध्यक्षपदाची जबाबदारी लवकरच रोहित पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्युरो

सांगली : अवघ्या 23 वर्षाच्या रोहित पाटील यांनी विरोधकांनाही धोबीपछाड देत कवठे-महाकाळ नगर पंचायतीनर आपले वर्चस्व निर्माण केलं. विरोधकांना धुळ चारली. राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांना रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. नगर पंचायतीत केलेल्या कामगिरीमुळे रोहित पाटील यांना राष्ट्रवादीकडून (ncp)मोठी जबाबदारी दिली जाण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.

''निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल,'' असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील (Rohit Patil) यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती. रोहित पाटील यांनी जे बोलले होते, ते करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता.

राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या  कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांची नगरपंचायतवर एकहाती सत्ता आली. 23 वर्षीय रोहितने राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवत या नगरपंचायत निवडणूकीत एकत्र आलेल्या विरोधकांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. या यशामुळे रोहित पाटील यांची राज्याच्या राजकारणात एन्ट्री होणार असल्याचे समजते. त्यांनावर राष्ट्रवादी नवीन जबाबदारी सोपविणार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेस युवक अध्यक्षपदाची जबाबदारी लवकरच रोहित पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. ''रोहित पाटीलसारखी मुलं विधानसभेत येणं गरजेचं आहे. त्यांचं वय कमी असेल त्यामुळे गेल्यावेळी त्यांना संधी दिली नसेल. मात्र, वय झालं की पक्ष नक्की विचार करेल, येत्या काळात पक्ष संधी देईल असा मला विश्वास आहे,'' असे रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

नगरपंचायतीच्या विजयाने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची विजयी सुरुवात झाली आहे. शिवाय राष्ट्रवादी पक्षातील रोहित पाटील यांचे वजन देखील वाढलंय, त्यामुळे आगामी विधानसभेत रोहित पाटील यांना विधानसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपला रोखण्याची जबाबदारी देण्यासाठी रोहित पाटील यांना राजकीय बळ मिळावे, यासाठीच त्यांच्या नावाची शिफारस युवकांच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी करण्यात आली आहे.

रोहित यांचे वडील दिवंगत आर. आर.पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्षपदाची धुरा पाच ते सहा वर्षे सांभाळलेली होती. तसेच राज्यात राष्ट्रवादीला सक्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान होते..  तासगाव, कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात आता रोहित पाटील यांच्याकडे  उद्योन्मुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT