Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील काँग्रेस नेते आणि लोकमान्य टिळक त्यांचे वंशज असलेले रोहित टिळक चर्चेत आहेत. कारण काँग्रेसमध्ये असताना देखील त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी देऊ केली होती.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा खासदार निवडणुकीमध्ये शिवसेनेने रोहित टिळक यांना उमेदवारी देऊन एक अतिरिक्त जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला आणि रोहित टिळक यांची संधी हुकली.
असं असलं तरी रोहित टिळक यांनी आता आपण लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला आहे. कारण स्वतंत्र पूर्व काळापासून टिळक घराणं हे काँग्रेसची संलग्न राहिलेले आहेत. त्यामुळे रोहित टिळक यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत.
यानंतर रोहित टिळक हे काँग्रेस पासून दूर का गेले? याबाबतच्या चर्चांना उधाण आला असून वर्षापूर्वी टिळक ट्रस्ट तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्कारामुळे काँग्रेसमधून रोहित टिळकांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच त्यांना काँग्रेस मधील सर्व कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं होतं. रोहित टिळक यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण देताना आपण अनेकदा या पुरस्काराबाबत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढून कोणताही रिस्पॉन्स न आल्याने आपण काँग्रेसचे काम थांबवलं होतं असं सांगितलं आहे.
एकीकडे पंतप्रधानांनी दिलेल्या पुरस्कारामुळे रोहित टिळक यांना काँग्रेस सोडावी लागत असताना त्यांच्या एका संस्थेच्या माध्यमातून गोव्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना एक पदवी बहाल केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून प्रमोद सावंत यांना डिलीट पदवी देण्यात आली आहे. ही पदवी त्यांनी समस्त गोवा वासियांना समर्पित केली असून गोवा 2.O मध्ये सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामानिमित्ताने डिलीट पदवी मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान या पदवीदान समारंभानंतर रोहित टिळक आता काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.