महाराष्ट्र

Ambadas Danve On Amit Shah: शाहांसमोर हात चोळत, मान खाली घालून महाराष्ट्राला पुढे नेणार का ?

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा विविध कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. सहकार विभागाच्या कार्यक्रमात शाह यांनी शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष करत अजित पवारांना दिलेले महत्व, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाह यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा व त्याचे केलेले खंडण अशा अनेक घडामोडींमुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

ठाकरे गटाने मात्र शाह यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अवस्था दर्शवणारे छायाचित्र दाखवत टीका केली आहे. (Shivsena) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून भाष्य करतांना `एक हात चोळत आणि दुसरा मान खाली घालून महाराष्ट्राला पुढे नेणार आहे का`? असा सवाल केला आहे.

अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शेजारी उभे असलेले शिंदे-फडणवीस-पवार यांचा एक फोटो दाखवत दानवे यांनी निशाणा साधला आहे. (Marathwada) आणि महाराष्ट्र घाबरून उभा आहे, बसा सांगायची वाट बघत. एक हात चोळत आणि दुसरा मुंडी खाली घालून. आणि हे महाराष्ट्राला पुढे नेणार? गुजरातची चाकरी करुन, नव्हे चाटूनच!, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर टीका केली.

केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या पोर्टल उद्घाटन सोहळ्यासाठी अमित शाह चिंचवडमध्ये आले होते. या कार्यक्रमातील काही छायाचित्रांचा संदर्भ देत अंबादास दानवे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा होऊन आठवडा उलटत नाही, तोच अमित शाह पुण्यात आले. मोदी यांच्यानंतर शाहा यांचा पुणे दौरा झाल्याने याची वेगळीच चर्चा सुरू आहे. मात्र या निमित्ताने ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस-पवार यांच्या ट्रिपल इंजिन सरकारवर टीका करण्याची संधी हेरली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT