Sadabhau Khot | NEET Protest | Dharmendra Pradhan Sarkarnama
महाराष्ट्र

Sadabhau Khot : "धर्मेंद्र प्रधानांचा अजिबात राजीनामा घेऊ नका; या आतंकवाद्यांना..."; CJP च्या आंदोलनावर टीका करताना सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य

Sadabhau Khot on Dharmendra Pradhan resignation: "या आंदोलनामध्ये मविआ आणि इंडिया आघाडी आतंकवादासारखी परिस्थिती या देशात निर्माण करू पाहत आहे. पण मी यांना सांगतो. देशात आदरणीय नरेंद्र, राज्यात आदरणीय देवेंद्र आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी काही बदल होणार नाही."

Jagdish Patil

Dharmendra Pradhan resignation demand latest: दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. काल याच आंदोलकांनी थेट संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

तरीही मोठ्या प्रमाणावर आंदोलक संसदेच्या मार्गाने गेले. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी आंदोलकांवर मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज केल्यामुळे तिथलं वातावरण चिघळलं. दरम्यान, काल झालेल्या लाठीचार्जनंतरही आज मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक जंतर-मंतरवर दाखल झाले आहेत.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी एकवटत असतानाच आता भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणान घेऊ नये आणि या आतंकवाद्यांना लोकशाहीच्या मार्गाने जशाच तसं उत्तर द्याव.", असं खोत यांनी म्हटलं आहे. आंदोलन करणाऱ्यांना आतंकवाद्यांची उपमा दिल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी जो शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "दिल्लीत आंदोलन चाललंय त्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी करत आहे.

म्हणजे या आंदोलनामध्ये मविआ आणि इंडिया आघाडी आतंकवादासारखी परिस्थिती या देशात निर्माण करू पाहत आहे. पण मी यांना सांगतो. देशात आदरणीय नरेंद्र, राज्यात आदरणीय देवेंद्र आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी काही बदल होणार नाही.

सरकारन शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये आणि अजितबात शिक्षण खात्यामध्ये बदल करू नयेत. कारण या आतंकवाद्यांना लोकशाहीच्या मार्गाने उत्तर द्यावं, जशाच तसं उत्तर द्यावं, कारण देश प्रगतीपथाच्या दिशेने जात असल्याचं या अतृप्त आत्म्यांना सहन होत नाही.", असं खोत यांनी म्हटलं आहे. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊ नका आणि आतंकवाद्यांना जशाच तसं उत्तर द्या असं खोत यांनी म्हटल्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT