Anil Parab
Anil Parab  Sarkarnama
महाराष्ट्र

ST Strike : कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांना आज पगार; संपकऱ्यांवर 'मेस्मा'ची कारवाई?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कामावर परतलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (st workers) खात्यात आज पगार जमा होणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी नोव्हेंबर महिन्यात संपावर तोडगा काढताना केलेल्या घोषणेप्रमाणे नव्या वेतनवाढीनुसार हा पगार जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यभरातील संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. पगार जमा झाल्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता आहे.

तर कामावर न परतलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या धोरणाप्रमाणे 'नो वर्क-नो पे' करण्याची घोषणा यापुर्वीच अनिल परब यांनी केली आहे. त्यामुळे अद्यापही संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार थांबवला जाण्याची शक्यता आहे. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मागच्या महिनाभरापासून राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संप मिटवण्यासाठी राज्य सरकारने भरघोस पगारवाढ देऊनही हजारो कर्मचाऱ्यांनी अद्यापही आंदोनलाचा पवित्रा कायम ठेवला आहे आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. तसेच एसटी महामंडळाकडूनही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

महामंडळाने सुमारे ७ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर दीड हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. या कारवाईमुळे आणि पगारवाढीमुळे काही ठिकाणी संपात फुटही पडली असल्याच पहायला मिळाल आहे. नोव्हेंबर महिनाअखेरीपर्यंत २० हजारांहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामध्ये सुमारे अडीच हजार चालक व २२०० वाहकांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT