Ajit Pawar And Shanishingnapur temple sarkarnama
महाराष्ट्र

Mumbai Politics : '...तर यापुढे मुस्लिम तुम्हाला मतदान करणार नाहीत', 'समाजवादी'च्या आमदाराचा राष्ट्रवादीला इशारा

Mla Rais Shaikh On NCP : कामाच्या ठिकाणी धार्मिक भेदभाव करत शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टने शंभर हून अधिक मुस्लिमधर्मीय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. यावरून आता टीका होताना दिसत आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टने शंभरहून अधिक मुस्लिमधर्मीय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात ट्रस्टने हे कर्मचारी अनेक महिने कर्तव्यावर हजर नव्हते असा दावा केला आहे. मात्र देवस्थानच्या चौथऱ्याची रंगरंगोटी मुस्लिम कर्मचाऱ्यांनी करू नये असा पवित्रा हिंदू आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतला होता. तसेच त्यांनी ट्रस्टवर मोर्चा आणण्याचा इशाराही दिला होता. यानंतर यावरून राज्यात जोरदार वादंग उठले होते. तर आता राष्ट्रवादीला समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी घेरलं आहे. त्यांनी राष्ट्रवादीचीही भाजप्रमाणेच भूमिका राहिल्यास येथून पुढे राष्ट्रवादीला मुस्लिम मतदान करणार नाहीत, असा इशारा दिला आहे.

रईस शेख यांनी, कामाच्या ठिकाणी धार्मिक भेदभाव करून नोकरीवरून कमी करणे हे नागरी हक्कांचे उल्लंघन करणारे आहे. शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टने देखील असेच कृत्य केलं असून 114 मुस्लिम धर्मीय कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. जे नियमबाह्य कृत्य असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टने घेतलेल्या या निर्णयाची पाठराखणं भाजप आघाडीतील आध्यात्मिक आघाडी करताना दिसत आहे. पण एकीकडे मुस्लिमांची पाठराखण करण्याचा दावा करणाऱ्या अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यावरू भाष्य करत नाही. याला राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत असल्याचा आरोप आमदार शेख यांनी केला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला यापुढे मुस्लिम मतदान करणार नाहीत,’ असा इशाराही दिला आहे.

यावेळी शेख म्हणाले, मुस्लिम आणि दलितांविरोधात काम करणे हे भाजप सरकारचे धोरण आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून मते मिळवणे आणि सत्ता काबीज करणे हे त्यामागचे मूळ कारण आहे. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातून या दोन समाजघटकांप्रति भेदभाव सुरू आहे. शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टने घेतलेला निर्णय हा देखील भाजप व संघाच्या धोरणाचा एक भाग असल्याचेच दावा देखील शेख यांनी केला आहे.

तसेच शेख पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळात सर्वाधिक मुस्लिम आमदार आहेत. अल्पसंख्याक खाते राष्ट्रवादीकडे आहे. तरीसुद्धा राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे. ट्रस्टने दावा केला आहे की ते मुस्लिम धर्मीय कर्मचारी मंदिरात कर्तव्यावर नव्हते. तर ते ट्रस्टच्या घनकचरा, कृषी, व्यवस्थापन या विभागात कर्तव्य बजावत होते, असाही दावा त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लवकरच भेट घेणार असून राष्ट्रवादीच्या त्या आमदाराची तक्रार करणार असल्याचेही आमदार शेख यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT