Sambhaji Bhide Guruji Sarkarnama
महाराष्ट्र

Sambhaji Bhide Controversial Statement : 'दांडिया खेळणं म्हणजे हांडगेपणा, नपुसंकत्व...', संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

Sambhaji Bhide Sangli Durga Daud : संभाजी भिडे यांनी सांगलीमध्ये आयोजित दुर्गा दौड कार्यक्रमाता वादग्रस्त विधान केले आहे. भारत हा निर्लज्ज लोकांचा देश असल्याचे ते म्हणाले.

Roshan More

Sambhaji Bhide News : शिवप्रतिष्ठाणच्या वतीने सांगलीत आयोजित दुर्गा माता दौड कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, 'गणपती उत्सवाचे आपण पार वाटोळं करून टाकलं. नवरात्राचं वाटोळ करून टाकलं. दांडिया म्हणजे हांडगेपणा, बुळगेपणा नपुंसकत्व तयार करणार खेळा.हिंदू समाजाने दांडीया खेळणं म्हणजे तो आपला हांडगेपणा, बुळगेपणा टाकयला तयार नसल्याचं लक्षण आहे.'

ते म्हणाले, 'जगात 187 देश आहेत. आपली, हिंदुस्थानची लायकी काय? संविधान. मुरडा झाल्यासारखं देश बांधव बोलतात. काय संविधान म्हणून. एक नाही दोन नाही नाही साडेबाराशे 1300 वर्ष मुस्लिम, युरोपीयन लोकांच्या गुलामीत खितपत पडलेला जीव असावा तसा हा देश आहे. ज्याला लाज वाटत नाही पारतंत्र्याची, गुलामीची. हा निर्लज्ज लोकांचा देश आहे.'

पुढे बोलताना संभाजी भिडे म्हणाले, 'शिवाजी महाराजांनी वयाच्या 15 व्या वर्षी विस्कटलेले नवरात्र पुनरुज्जीवन करण्याची शपथ घे तली. आपल्याला फक्त स्वराज, स्वातंत्र नकोय. आपल्याल हिंदी स्वराज हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. नवरात्रीला त्यांनी विस्कटलेल्या नवरात्रीचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली त्याच प्रेरणेतून आपल दुर्गामाता दौड घेतो. त्यांचा आदर्श घेऊन आपण आईच्या दारात येतो.'

संभाजी भिडेंची याआधीही वादग्रस्त वक्तव्य

संभाजी भिडे यांनी याआधी देखील वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. सर्वधर्मसमभाव म्हणजे धड स्त्री ना धड पुरुष अशी स्थिती आहे. म्हणजे निव्वळ नपुकसंत्व. निचपणा, असे ते म्हटले होते. आंबे खाल्ल्याने मुलं होतात, असे देखील वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. तसेच त्यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याविषयी देखील वादग्रस्त विधाने केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT