Sambhaji Raje .jpg
Sambhaji Raje .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

सेनेतील मराठा आमदारांकरवी दबाव आणण्याचा संभाजीराजे समर्थकांचा प्रयत्न

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : राज्यसभेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी आता मराठा संघटनांनी (Maratha organisation) व्‍यूहरचना करण्‍यास सुरुवात केली आहे. संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देण्यास नकार दिल्याचा सेनेला राजकीय फटका बसेल, असे हे समर्थक सांगत आहेत. मराठा समाज सेनेच्या विरोधात जाऊ शकतो, अशी मांडणी हे कार्यकर्ते करत आहेत. त्यासाठी सेनेतील मराठा नेत्यांना, आमदारांना भेटून ते भूमिका मांडत आहेत. अर्थात त्यांच्या दबावाला पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कितपत प्रतिसाद देणार याची साशंकता आहे. (Rajya Sabha election 2022 updates)

शिवसेनेचा संभाजीराजेंना विरोध नाही. त्यांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी. अपक्ष म्हणून पाठिंबा देणे पक्षाला योग्य वाटत नसल्याचे आमदार मंडळी समजावून सांगत आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी या कार्यकर्त्यांनी भेट घेतली होती. कोणत्याही अटी, शर्ती न ठेवता संभाजी राजे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र या भेटीनंतरही शिवसेनेचा निर्णय कायम राहिला आहे.

मराठा समाजाच्या प्रश्नासाठी तसेच समाजातील अनेक विविध प्रश्नांसाठी संभाजीराजे यांना ही जागा द्यावी, असे या वेळी मराठा संघटनाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम राहील, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिंदे यांनी तरी या प्रश्नांतून आपली सुटका करून घेतली आहे. मात्र इतर मराठा नेत्यांकडे जाऊन हे समर्थक राजेंच्या पाठिंब्यासाठी आग्रह धरत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT