Sangli ZP Election 2026 Sarkarnama
महाराष्ट्र

Sangli ZP Election: दोन्ही राष्ट्रवादी अन् शिंदेसेनेला एकाच मांडवाखाली आणण्यासाठी जयंत पाटलांचा डाव यशस्वी होणार का?

Sangli ZP election 2026 alliance updates: जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी व शिंदेसेनेला एकाच मांडवाखाली आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांची ही खेळी यशस्वी झाली तर भाजपला वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली जाऊ शकते. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी व शिंदेसेना भूमिका जाहीर करणार आहे.

Rahul Gadkar

Sangli Political News: सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये महायुतीच्या घटक पक्षांसोबत भाजपने केलेली दादागिरी भोवण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निकालानंतर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला गृहीत धरल्याने पुन्हा एकदा नाराजी वाढली आहे.

जागा वाटपामध्ये दिलेले स्थान आणि निवडून आल्यानंतर गृहीत धरण्याची भूमिका भाजपचे नेते सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज झाल्याचे चित्र आहे.

त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गुप्त बैठकी सुरू आहेत. आमदार जयंत पाटील यांच्याकडून देखील काही गुप्तपणे बैठका घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन करणे बाबत सांगली जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष होईल असे विधान केल्यानंतर महायुती मधील अंतर्गत नाराजी आणि मतभेद समोर आली आहे.

पर्यटनमंत्री तसेच शिंदेसेनेचे सांगली जिल्ह्याचे संपर्कमंत्री शंभूराजे देसाई यांनी भाजपने सत्तेसाठी गृहीत धरल्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. सत्ता स्थापनेबाबत भाजपसोबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षानेही भाजपला प्रतिसाद दिलेला नाही.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुप्त बैठका सुरू असून अन्य पक्षाला सोबत घेऊन आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सांगली जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

याशिवाय महायुती व महाविकास आघाडीचे मित्रपक्ष एकत्र आले तरीही त्यांचे संख्याबळ नाही. महायुतीकडे काठावरचे बहुमत असले तरी समन्वय नसल्याने आणि मतभेद असल्याने सध्यातरी घटकपक्षाची नाराजी दिसून येत आहे.

त्यामुळे सत्तास्थापनेसाठी खेचाखेची व नव्या खेळ्यांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या १८, काँग्रेसच्या ११ व उद्धवसेनेची एक जागा अशी आघाडीचे संख्याबळ ३० होते. महायुतीची गोळाबेरीज ३१ होते, मात्र महायुतीत वाद होत असल्याने सत्तेचे समीकरण जुळलेले नाही.

जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी व शिंदेसेनेला एकाच मांडवाखाली आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांची ही खेळी यशस्वी झाली तर भाजपला वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली जाऊ शकते. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व शिंदेसेना भूमिका जाहीर करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT