Sanjay Gaikwad News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. शिवाजी कोण होता? या पुस्तकासोबतच उद्धव ठाकरे यांचे आजोबा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या 'दगलबाज शिवाजी' या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय गायकवाड म्हणाले, ' शिवाजी कोण होता? या पुस्तकाबद्दल वक्तव्य केलं होतं जी शिवीगाळ केली होती त्याबद्दल मी आधीच दिलीगीरी व्यक्त केली आहे.कोर्टाने जे आदेश दिलेत त्याचा मी सन्मान करतो. पोलिसांना जो काही तपास करायचा आहे त्यासाठी मी तयार आहे.'
पुढे बोलताना ते म्हणाले, 'यापुढेही शिवाजी महाराजांचा अपमान करणारा विषय असेल तर त्या भूमिकेवर मी कायमचा ठाम आहे. येणाऱ्या विधानसभेत देखील मी 'दगलबाज शिवाजी', 'शिवाजी कोण होता?' या सगळ्या पुस्तकांवर माननीय मुख्यमंत्र्यांनाना, सभागृहाला बंदी आणण्यासाठी विनंती करणार आहे. तो माझा विषय राहणार आहे.'
शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून आमदार गायकवाड यांनी शिवीगाळ केली होती. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा न्यायलयात अर्ज करत आमदार गायकवाड यांच्या चौकशीची मागणी केली होती. न्यायलयाने ही मागणी मान्य करत चौकशीला परवानगी दिली आहे.
न्यायालयाने गायकवाड यांच्या चौकशीसाठी परवानगी दिली आहे.त्यामुळे आता पोलिसांकडून आमदार गायकवाड यांची चौकशी होणार आहे. दरम्यान, गायकवाड यांनी पोलिसांना आपण सहकार्य करणार असून यापूर्वी आपण दिलीगीर व्यक्त केली आहे. मी तपासाठी तयार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.