Sharad Pawar News  Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar News: 'सदाभाऊ खोत फडणवीसांच्या फडातील नाच्या'; शेतकऱ्यांचे पैसे हडप केले...!

Maharashtra Politics:सदाभाऊंनी शेतकरी चळवळ मोडीत काढली. शेतकरी संप मोडीत काढला.

Mangesh Mahale

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे नवं निवडणूक चिन्ह दिले आहे.'तुतारी'वरुन भाजपचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पवारावर टीका केली होती. त्याला सदाभाऊ खोत यांचे शेतकरी संघटनेतील जुने सहकारी, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. घाटणेकरांनी खोतांवर गंभीर आरोप केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकरी संप मोडीत काढला...

"सदाभाऊ हे देवेंद्र फडणवीस यांच्या फडातील नाच्या आहेत," अशी बोचरी टीका घाटणेकर यांनी केली आहे. तुतारी या निवडणूक चिन्हावरून खोतांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्याला घाटणेकरांनी सडेतोड उत्तर दिले. सदाभाऊंनी शेतकरी चळवळ मोडीत काढली. अनेक जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी दिलेले पैसे हडप केले. शेतकरी संप मोडीत काढला. कारण ते आता फडणवीसांच्या फडातील नाच्या झाले आहे," अशी टीका केली आहे.

शरद पवार यांच्या पक्षाला आता तुतारी चिन्ह मिळाले आहे. तुतारीचा उपयोग दोन वेळा केला जातो. लक्ष्मीच्या पावलाने नवरी घरी येताना, नवऱ्याला हळद लागल्यावर आणि स्मशानात जाताना केला जातो, असे सांगत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली होती. सदाभाऊ खोतांनी इस्लामपुरात बोलत होते.

इस्लामपूरमध्ये महायुतीचा रयत क्रांती संघटना पुरस्कृत शेतकरी कामगार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी खोत यांनी संवाद साधला आहे. त्यांनी शरद पवारांवर वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ही उपस्थित होते. दोन महिन्यापूर्वी सांगलीत झालेल्या भाजपच्या मेळाव्यात त्यांनी आमची अवस्था बँडवाल्यासारखी झाली असल्याचे म्हटले होते. ते विधान त्यांना चांगलेच भोवले होते. त्यांच्या विरोधात अवंतिका बँड बँजो असोसिएशनने आंदोलन करून इशारा दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT