Sanjay Raut
Sanjay Raut  Sarkaranama
महाराष्ट्र

तुरुंग काय तुमच्या बापाचे आहेत का? की खाजगीकरण केलंय?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून भाजपचे नेते महाविकास आघाडीतील नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात लवकरच तुरुंगात पाठवणार असल्याचे अनेक इशारे देत आहेत. यात 'या' नेत्यांची दिवाळी तुरुंगात जाणार, या नेत्यांचे नवीन वर्ष तुरुंगात जाणार असे इशारे देत आहेत. किरीट सोमय्या तर सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांकडे तक्रार करत ठाकरे सरकार मधील ३ मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे सांगत आहेत. मात्र आता याच सगळ्या इशाऱ्यांवर आणि नेत्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठाकरी शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप मधले काही लोक धमक्या देत आहेत. पण हे ज्यांचा भाजपाशी काही संबध नाही, जे मुळ भाजप मधले नाहीत, ज्यांना भाजपची माहित नाही, विचारधारा माहीत नाही असे काही फुटकळ लोक धमक्या देत आहेत. हे बाहेरून आलेले लोक आहेत. रोज उठतात आणि बोलतात ह्याला तुरुंगात टाकू, ह्याला तुरुंगात टाकु. तुरुंग विकलेत का? तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? असा काहीसा रोकठोक सवालही त्यांनी विचारला.

तुरूंगांच खासगीकरण केल आहे?

सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत म्हणतात, पंतप्रधान मोदींनी आता रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळेच खासगी केले आहे. अनेक सरकारी कंपन्या आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकण्यात आल्या. ‘‘दोघेजण विकायला बसलेत व दोघेच जण खरेदी करतात,’’ अशी टवाळी त्यावर सुरू आहे. पण आता ईडी, सीबीआय, एनसीबी या यंत्रणा ज्या पद्धतीने काम करतायत, ते पाहाता त्यांचेही खासगीकरण झाल्याचे चित्र आहे.

राज्यात याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू असं भाजपाचे नेते सांगतात तेव्हा देशातल्या तुरुंगांचेही खासगीकरण केले का? आणि त्यांच्या चाव्या ह्या बाहेरुन आलेल्या काही लोकांकडे दिल्या आहेत का? जर खासगीकरण केले असेल अशा वेळी मोदी है तो मुमकीन है हे खरं वाटते. असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. तसेच आज ह्याचा नंबर उद्या त्याचा नंबर म्हणता पण उद्या तुमचाही नंबर येईल असा इशाही राऊत यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT