sanjay raut, ajit pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut Politics : अजित पवारांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांनी सांगितले 'हे' कारण

Sanjay Raut on Ajit Pawar Resignation: लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार झाले आहेत. आमचे लाडक्या भावांनी नावे बदलून या योजनेत अनुदान घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

Sampat Devgire

Shiv Sena vs Ajit Pawar: अडीच हजारहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. आदिवासी विकास विभागाचा मोठा निधी या योजनेसाठी वळविण्यात आला. यासह अनेक गैरप्रकार लाडकी बहीण योजनेत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. आता या योजनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, 'मतांसाठी निवडणुकीत या योजनेतून जाणीवपूर्वक मतदारांवर प्रभाव टाकण्यात आला. बनावट लाभार्थ्यांना त्याचा लाभ होत असल्याचे दिसले. मात्र राजकीय हेतूने त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.या योजनेतून राज्य शासनाच्या तिजोरीची जाणीवपूर्वक लूट होऊ दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत दुर्लक्ष केले. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली. त्यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीची लूट होण्यास जबाबदार असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे.'

'लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार झाले आहेत. आमचे लाडक्या भावांनी नावे बदलून या योजनेत अनुदान घेतले. सत्ताधारी पक्षाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले. त्यात आता सबंध राज्य शासन अडचणीत आल्याचे चित्र आहे. जबाबदारी सत्ताधारी पक्षाने घेतली पाहिजे', असे देखील राऊत म्हणाले.

मंत्र्यांना अधिकारी नाहीत

राज्यमंत्र्यांना अद्याप जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी याबाबत तक्रार केल्याचे पुढे आले आहे. यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि राज्य शासनावर टीका केली. ते म्हणाले राज्यमंत्र्यांचे काय घेऊन बसला आहात?. राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांना तरी कोणते अधिकार दिले आहेत. राज्यात आणि केंद्रात सगळीकडे मंत्र्यांना काहीही अधिकार नाहीत असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

पालकमंत्री पोलिसांवर दबाव टाकतात

नाशिकला पालकमंत्री नाही त्यामुळे काहीही अडलेले नाही असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले होते. त्यावर खासदार राऊत यांनी पालकमंत्री नसल्याने काहीही अडत नाही हे खरे आहे. पालकमंत्री तरी काय करतात हे पाहिले पाहिजे. पालकमंत्री सध्या फक्त पोलिसांवर दबाव टाकून राजकीय कामे करण्यासाठी आहेत. त्यामुळे केवळ पालकमंत्रीच नव्हे तर राज्यातील मंत्रिमंडळ नसल्याने तरी कुठे काही अडते आहे, असा प्रतिप्रश्न राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT