Sharad Pawar,Sanjay Raut .jpg
Sharad Pawar,Sanjay Raut .jpg 
महाराष्ट्र

फडणवीसांच्या बॉम्बआधी राऊत सिल्वर ओकवर तर पवारांची गृहमंत्री, आयुक्तांसोबत बैठक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेवून बॉम्ब फोडणार आहेत. दिवाळी पुर्वीच त्यांनी आपण दिवाळीनंतर बॉम्ब फोरणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस नेमका कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र अशातच आता या पत्रकार परिषदेपुर्वी राज्यात बैठकांनी जोर पकडला आहे.

आज सकाळीच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जावून भेट घेतली. आज अगदी सकाळी ९ च्या सुमारास संजय राऊत सिल्वर ओकवर दाखल झाले. या भेटीचे कारण शरद पवार आणि कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी राऊत यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र सुत्रांच्या माहिती नुसार राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि एकुणच सध्या सुरू असलेल्या आर्यन खान-समीर वानखेडे प्रकरण, परमबीर सिंग प्रकरणातील अटकेच्या घडामोडी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटक प्रकरण आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद या विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत - शरद पवार बैठकीनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरीही शरद पवारांनी गृहमंत्री आणि मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह एक महत्वाची बैठक घेतली. यात देखील सध्या सुरु आर्यन खान-समीर वानखेडे प्रकरण, त्यावरुन होत असलेले आरोप-प्रत्यारोप, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद यावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT