Sanjay Raut On Eknath Shinde : कर्नाटक निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी निवडणुकीच्या प्रचारात धार वाढताना दिसत आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी राहुल गांधी कर्नाटकात तळ ठोकून आहेत. प्रचार सभा होत आहेत. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकात जाणार आहेत असे वृत्त आले होते, यावर आता संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "सीमाभागात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे इथे येत असत, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यायचे, छगन भुजबळ यायचे. एक कमिटमेंच आहे आमची. या निवडणुकीत सीमाभागामध्ये मराठी एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करणं, त्यांना निवडून आणणं, ही आमची कमिटमेंट आहे."
"सीमाभागात सगळ्यांनी एकत्र राहावं अशी आमची भूमिका आहे. तरी भाजपचे लोक इकडे येतात, त्यांचे उमेदवार उभे करतात. मात्र आम्ही शक्यतो टाळतो. आम्ही आमचे उमेदवार देणे टाळतो, आणि एकीकरण समितीच्या उमेदवारांशिवाय इतरांचा प्रचार करणे टाळतो, असेही राऊत म्हणाले.
संजय राऊत मुख्यमंत्री शिंदेंवर निशाण साधत म्हणाले, "मला असं कळलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कर्नाटकात येत आहेत. मी त्यांना आवाहन केलं, मुख्यमंत्र्यांचा दावा असतो की, आम्ही बेळगावात तुरूंगात गेलो असतो. मग आता एकीकरण समितीच्या प्रचाराला इथे या. उलट इथे काही खोके पाठवलेत, एकीकरण समितीचे उमेदवार पाडण्यासाठी, ही तुमची निष्ठा महाराष्ट्रावरती? असा हल्लाबोल राऊतांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.