मुंबई : ''आम्हाला कोणाच्या युतीची गरज नाही. जर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी गोव्यात निवडणूक (goa election)लढवू शकतात तर महाराष्ट्र का नाही. महाराष्ट्र बाजूलाच आहे. आमची मोर्चेबांधणी देखील उत्तम आहे. त्यामुळे गोव्याची निवडणूक पूर्ण ताकदीन लढणार,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
पुढील वर्षी गोव्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्राप्रमाणेच गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल का? या प्रश्नाला उत्तर राऊतांनी दिले.
संजय राऊत म्हणाले, ''गोव्यातील काँग्रेस आणि शिवसेनाबाबतच्या युती संदर्भात प्राथमिक चर्चा सुरु आहे. माझी काँग्रेसमधील काही लोकांशी चर्चा सुरु आहे. पण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. ज्या राज्यात अशाप्रकारच्या आघाड्या करायच्या आहेत त्या राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करायला लागते. ती प्रकिया तशी मोठी आहे. जर आघाडी झाली तर त्याचे स्वागत आहे. पंरतु ते तयार झाले नाहीतर आम्ही गोव्यात २२ जागांवर स्वतंत्र लढू,''
''गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला कोणाच्या युतीची गरज नाही, गोव्यात ४० जागांपैकी आम्ही २२ जागांवर लढणार आहोत,'' असे राऊत म्हणाले. कॉग्रेससोबत याबाबत चर्चा सुरु असून सकारात्मक निर्णय़ झाला तर युती होईल अन्यथा शिवसेना (shivsena) स्वबळावर पूर्ण ताकदीने लढेल असे संजय राऊत म्हणाले.
गोव्यातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील गोव्यातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच शिवसेना देखील पूर्ण ताकदीने गोवा निवडणूक लढवणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याप्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. राऊतांच्या विधानावरून भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
सोमवारी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, माझ्याविरोधात दिल्ली गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय हेतू आहे. माझा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. सीबीआय, आयटी, ईडीचा माझ्याविरोधात वापर करता आला नाही म्हणून माझ्या पक्षाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. मी एक खासदार आहे, माझ्याविरोधात तक्रार देण्यास काहींना प्रेरित करणे चुकीचे आहे, असे राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.