Sharad Pawar, Sanjay Raut, Balashab  sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊत म्हणतात... मी शरद पवारांचा चेला आहे!

सरकारनामा ब्यूरो

Nagpur : संजय राऊत हे आपल्या आक्रमक शैलीत महायुती सरकारवर कडाडले. तीन राज्यांच्या निवडणुकीत काय झाले याचे आम्हाला देणेघेणे नाही. हा महाराष्ट्र आहे. त्या तीन राज्यांच्या निवडणुकीचा परिणाम येथे होणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आणि शरद पवारांचा चेला आहे. याला म्हणताता डबल इंजिन. तुम्ही आमचा पक्ष फोडला आम्ही तुम्हाला फोडू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप सभेत राऊत बोलत होते. ही मर्दांची सभा आहे. ही संघर्ष करणाऱ्यांची सभा आहे.मध्यप्रदेशची हवा महाराष्ट्राला लागणार नाही. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार आणू. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि देशात क्रांती करायची आहे, असे राऊत म्हणाले.

सभेला उपस्थित असलेल्या अनिल देशमुख यांनी उद्देशून अनिल बाबू हे माझे जेलमधील मित्र आहेत. आणि जेलमधील मैत्री पक्की असते. संघर्ष करणाऱ्यांची मैत्री पक्की असते. आम्ही झुकलो नाही. अंगावर या असे थेट आव्हानच राऊत यांनी विरोधकांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहिले, याची आठवण ही राऊत यांनी करू दिली.

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर मोदी गॅरंटीचा विजय असल्याचे सांगण्यात येत होते. खुद्द मोदींनी जाहीर सभेत मोदी गॅरंटीचा उल्लेख केला. त्यावर देखील नरेंद्र मोदी हे देशभर गॅरंटी देत फिरत आहेत. मात्र, आजच्या सभेची गर्दी गॅरंटी देते की 2024 मोदी सत्तेवर येणारन नाहीत. आणि 2024 मध्ये फडणवीस ही सत्तेत नसतील याची आम्ही गॅरंटी देतो. मागील दहा वर्ष देश थांबला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेचा दाखल देत हा देश लढणाऱ्यांच्य मागे उभा राहतो. देशातील नेते जेव्हा चालतात तेव्हा परिवर्तन घडतं. रोहित पवार यांनी तरुणांचे नेतृत्व करून पदयात्रा केली आहे. आपण महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून मराठी माणूस म्हणून एक आहोत, असे राऊत म्हणाले.

युवा संघर्ष यात्रेच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. सभा संपल्यानंतर निवदेन घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले नाही म्हणून युवा संघर्ष यात्रेतील तरुण थेट विधानसभेकडे चालत गेले. त्यांच्यासोबत आमदारा रोहित पवार देखील होते. पोलिसांनी या तरुणांना आडवले. त्यामुळे संघर्षाचे वातावरण तयार झाले होते. एका तरुणाच्या पायाला देखील लागले. रोहित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेत विधानसभेच्या परिसरातून दूर नेले.

(Edited by : Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT