Sarpanch Elections Sarkarnama
महाराष्ट्र

Sarpanch Election : संतोष देशमुख यांच्या मस्साजोगमध्ये पोटनिवडणूक; कोण उमेदवार? 471 गावांमध्ये सरपंच अन् सदस्य पदांसाठीही निवडणुकीच्या तारखा जाहीर...

Massajog Bypoll Candidate Update Sarpanch Elections : संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून मस्साजोगचे सरपंचपद रिक्त आहे.

Rajanand More

Sarpanch election dates : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशणुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर मस्साजोग गावचे सरपंच पद रिक्त झाले होते. त्याचप्रमाणे निधन, राजीनामा किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या सरपंचपद व सदस्यपदाच्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ४७१ गावातील सरपंच पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे सदस्यांच्या तब्बल ३१२० जागा रिक्त आहेत. अशा एकूण ३५९१ रिक्त जागांसाठी आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार ३० मार्चपासून या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

तहसिलदारांकडून ३० मार्चला निवडणुकीची नोटीस प्रसिध्द केली जाईल. इच्छुकांना ता. ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. उमेदवारी अर्जांची छाननी १५ एप्रिलला होईल. तर उमेदवारांना १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

निवडणूक चिन्ह देण्याचा आणि अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा अखेरचा दिवस १७ एप्रिल आहे. तर २८ एप्रिल रोजी मतदान आणि २९ एप्रिलला मतमोजणी होईल. राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३९ गावांमध्ये सरपंच पदासाठी तर पुणे जिल्ह्यात सर्वाधित २२६ सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ११(३) मधील तरतुदीनुसार ज्या ग्रामपंचायतींची मुदत समाप्त होण्यास (निवडणूक नोटीस प्रसिध्दीच्या दिनांकापासून) ६ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, अशा ग्रामपंचायतीतील रिक्त जागांचा समावेश या पोटनिवडणूक कार्यक्रमात करण्यात येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

मस्साजोगमध्ये कोण सरपंच?

संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून मस्साजोगचे सरपंचपद रिक्त आहे. आता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या सरपंचपदासाठी कोण उमेदवार असणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याचीही उत्सुकता लागली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT