Ambadas Danve Sudarshan Ghule Sudhir Sangle sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve : घटनास्थळापासून 250 किलोमीटवर सापडले आरोपी, अंबादास दानवेंना वेगळाच संशय

santosh deshmukh Murder case Ambadas Danve Sudarshan Ghule Sudhir Sangle : संतोष देशमुख हत्येप्रकरणातले पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका खोलीमध्ये लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार सापळ रचून पोलिसांनी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला अटक केली.

Roshan More

Ambadas Danve News :संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी आज (शनिवारी) पुण्यामधून अटक केली. पोलिसांनी आरोपींना अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होते आहे. मात्र, खूनाच्या 22 ते 23 दिवसांनी आरोपींना अटक केल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव येत असलेले वाल्मिक कराड यांच्यावर कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांनी सीआयडीसमोर सरेंडर देखील केले आहे. मात्र, प्रत्यक्ष देशमुख यांची हत्या असणारे आरोपींना पुण्यातून आज (शनिवारी) अटक केल्याने घटनास्थळापासून अवघ्या 250 किलोमीटर आरोपी कोण्याच्या तरी आश्रयाने आणि सुरक्षेमुळे लपले असावेत, असा संशय दानवे यांनी व्यक्त केल्या आहे.

अंबादास दानवे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून (ट्विटर) म्हटले आहे की, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी पकडले गेले आहेत. तब्बल 22-23 दिवस गुंगारा देत फिरणारे हे आरोपी घटनस्थळापासून केवळ 250 किमी अंतरावर पुण्यात सापडतात. यांना कोणी आश्रय दिला, सुरक्षा कोणी दिली, ही नावे आता तातडीने समोर यायला हवीत.

बालेवाडी परिसरात सापळा रचून अटक

मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका खोलीमध्ये लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला अटक केली मात्र कृष्णा आंधळे हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिस पथक त्याच्या मागावर आहे.

सिद्धार्थ सोनावणेला अटक

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्याच गावातील सिद्धार्थ सोनावणे याला देखील अटक करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सिद्धार्थ उपस्थित होता. पोलिसांच्या रडावर तो असल्याने तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला कल्याणमधून एका उसाच्या रसाच्या गाडीवरून अटक केली. आरोपींना सिद्धार्थ याने संतोष देशमुखचे लोकेशन दिल्याचा संशय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT