Dhananjay Munde Meets Ajit Pawar  sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde Video : मोठी बातमी! धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट, मंत्रिपद धोक्यात?

santosh deshmukh Murder case Dhananjay Munde Meets Ajit Pawar : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.

Roshan More

Dhananjay Munde News : संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधाकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. आज सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचे निवेदन दिले. त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आल्याच्या चर्चा आहेत. सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटल्यानंतर धनंजय मुंडे तातडीने अजित पवार यांची भेट घेण्यास दाखल झाले. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

धनंजय मुंडे कोणत्या कारणाने अजित पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत त्यांनी अजित पवारांची आधीच वेळ घेतली होती का? या विषयी माहिती मिळू शकले नाही. मात्र, सर्वपक्षीय नेत्यांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याने याबाबत अजित पवारांच्या समोर मुंडे आपली बाजु मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर थेट धनंजय मुंडेंना टार्गेट केले. ते म्हणाले आमची मागणी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अथवा चार्टशिट दाखल होई पर्यंत त्यांना बिनखात्याचे मंत्री करण्यात यावे.

मुंडेंच्या पालकमंत्रिपदाला विरोध

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. मागील महायुतीच्या सरकारच्या काळात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते. मात्र, त्यांनी आपले पद वाल्मिक कराड यांना चालवायला दिल्याचे आरोप सुरेश धस यांनी केले होते. त्यामुळे बीडचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावे ते मुंडे यांना देऊ नये, अशी मागणी केली होती. अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल धनंजय मुंडे हे पालकमंत्रिपदाबाबत देखील अजित पवारांशी चर्चा करण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT