वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आलिशान फॉर्च्यूनर गाडी नुकतीच चर्चेत आली. हगवणे कुटुंबाने लग्नाच्या हुंड्यात फॉर्च्यूनर घेतल्याची माहिती समोर आली. कस्पटे कुटुंबाकडून हुंडा म्हणून लग्नात फॉर्च्यूनर घेतल्याचं समोर आले आहे. करमाळा तालुक्यातील अतुल खुपसे यांनी नुकतीच नवीन फॉर्च्यूनर कार खरेदी केली आहे. पण लोक आपल्याकडे संशयाने पाहू नये म्हणून त्यांनी गाडीच्या मागील काचेवर कविता लिहून स्पष्टीकरण दिले आहे.
"तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी! मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा, अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलय पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलंय," असा मजकूर कारच्या मागील बाजूला लिहिलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत युती केल्याने सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले होते. या युतीमुळे अपेक्षित असाच निकाल लागला. काँग्रेस-भाजप युतीचे पॅनेल निवडणूक आले तर एकाकी पडलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर याच्या पॅनेलचा चा पराभव झाला. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार आणि भाजपचे माजी आमदार टेकचंद सावकर यांच्या पॅनेलचे सर्व १३ उमेदवार निवडूण आले आहेत.
लोक जनशक्ति पार्टी (रामविलास)चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठा संकेत दिला आहे. आपण अधिक काळ केंद्रातील सत्तेत सहभागी राहणार नाही, आपलं पूर्ण लक्ष हे बिहार आणि येथील जनतेवर असेल, असे ते म्हणाले. ते राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार आहेत.
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकीच्या संदर्भात स्षप्ट आदेश दिला आहे. आयोगाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे संभ्रम अद्याप कायम आहे. निवडणुका दिवाळीनंतरच घेतल्या जातील असे दावे केले जात आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुका केव्हा होतील याचे सुतोवाच केले आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
भाजपचे आक्रमक आमदार नितेश राणे यांना दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राणे यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणी आज माझगाव न्यायालयाकडून राणेंना अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुढील सुनावणी 26 जूनला होणार आहे.
Pune News: मनी लाँड्रिंग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची 6 कोटी 29 लाखांची फसवणूक झाली आहे. पुणे सायबर पोलिसांनी सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक केली आहे. तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (२८, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) असे या सायबर चोरट्याचे नाव आहे. तुषार वाजंत्री हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे.
सत्तेतील एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आला आहे तसंच त्याची पत्नी एका गावची सरपंच असून तीही त्याच राजकीय पक्षाशी निगडित असल्याचं समोर आला आहे
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. वैष्णवीचा पती शंशाक हगवणे आणि सासून लता हगवणे यांना म्हाळुंगे पोलिस अटक करणार आहेत. हगवणे माय-लेकानं जेसीबीची विक्री करताना प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केली होती, याबाबतची तक्रार येळवंडे यांनी दिली होती.या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने हगवणे माय-लेकाला अटक करण्याची परवानगी दिली आहे. येरवडा तुरुंगातून म्हाळुंगे पोलीस दोघांचा ताबा घेणार असल्याची माहिती आहे.
गैरकारभाराचा आरोप असलेल्या 55 संचालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांनी चौकशी समितीसमोर हजर राहून माहिती द्यावी लागणार आहे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती नियमबाह्य भरती आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप या संचालकांवर आहे. 1993 ते 1913 या दरम्यान हा प्रकार घडला होता.
महाराष्ट्र गुजरातमधून राज्यात येणाऱ्या बनावट बियाणांवर कृषी विभागाची कारवाई करण्यास सुरवात केली आहे. बनावट बियाणांबाबत धुळे येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. 30 लाखांपर्यंत बनावट बियाणे व मुद्देमाल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. गुजरातकडून महाराष्ट्रामध्ये ही बनावट बियाणे आणण्यात येत असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.