Uddhav Thackeray .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics: BMC निवडणुकीच्या आधीच ठाकरेंना मोठा धक्का; 2 माजी नगरसेवक भाजपमध्ये

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

US attacks on Iran:  येमेनने अमेरिकेला धमकी देत युद्धात उतरण्याची केली घोषणा 

इस्रायल आणि इराणमधील युद्धात अमेरिकने एन्ट्री केल्यानं आता एक मुस्लीम देश मदतीसाठी धावला आहे. येमेनने अमेरिकेला धमकी देत युद्धात उतरण्याची घोषणा केली आहे. लाल समुद्रात हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून येमेनमधील हुथी बंडखोर तेहरानशी समन्वय साधत आहेत. अन्सार अल्लाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुथींनी 2023 पासून इस्रायलवर हल्ले सुरू केले आहेत आणि लाल समुद्रात जहाजे पाठवली आहेत, असे ते म्हणतात, ते गाझामधील पॅलेस्टिनींना पाठिंबा देत आहेत.

Rajkot Fort News: पर्यटकांमध्ये नाराजी; राजकोट किल्ला आजपासून बंद

मालवण येथील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला नुकतीच चौथर्‍याच्या बाजूची जमीन खचली होती. चौथऱ्याच्या परिसरातील दुरुस्ती काम करण्यासाठी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कामे पूर्ण होईपर्यंत रविवार २२ जूनपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेत आहेत. बैठकीला प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री हे चर्चा करणार आहेत. कुंभमेळासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर अनुषंगाने मोठ्या संख्येने भाविक हे त्रंबकेश्वरला येणार आहे.यासाठी रस्त्याच्या विकासाच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाच्याअधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे.

srael Iran War: इराणमध्ये आणीबाणी जाहीर

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर येथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे, शाळा, कॉलेज, कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

Malegaon News: माळेगाव मतदान केंद्रावर गर्दी

माळेगाव बुद्रुक मतदान केंद्रावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली असता सभासदांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती

BJP News: आज भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात त्यांच्या प्रवेश होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप गटनेते प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Pandharpur News:  पंढरपूर शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता

आषाढीवारीनिमित्त पंढरपुरात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. चंद्रभागा वाळवंट, भक्ती सागर, वाखरी पालखी तळ,दर्शनबारी, प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर यासह पंढरपूर शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT