Ajit Pawar Dhananjay Munde 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political News Live : मोठी बातमी! धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला 'देवगिरी'वर दाखल

Sarkarnama Headlines Updates Marathi Politics: राजकीय व प्रशासकीय घडामोडी वाचा एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्युरो

धनंजय मुंडे 'देवगिरी'वर दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी या शासकीय निवास्थानी पोहचले आहेत. या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील हजर आहेत.

Manipur Goverment : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय 

मणिपूरमधील राजकीय अस्थिरता पाहता त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. एन. बिरेन सिंह यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Vijay Vadettiwar : काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा नाना पाटोले यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली तर काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Ajit Pawar : अजित पवार यांच्या उपस्थितीत 28 फेब्रुवारीला होणार प्रवेश सोहळा

काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. 28 फेब्रुवारी रोजी हंबर्डे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडणार आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात ते प्रवेश करणार आहेत.

Rajan Salvi : राजन साळवींना बोलून दाखवली मनातील खदखद

एकनाथ शिंदे यांनी २०१४ मध्ये मंत्रिपदासाठी माझी शिफारस केली होती. मात्र, होऊ शकलो नाही. विनायक राऊत यांनी दीपक केसरकरला मंत्री केले. राजन साळवी तिथंच राहिला. त्यानंतर २०१९ निवडणूक आली. त्या वेळी मला संधी मिळेल, असं वाटलं होतं. मात्र, त्या वेळी उदय सामंत यांना मंत्री करण्यात आले. पुढे २०२४ मध्ये मला संधी मिळेल, असं वाटलं होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं, अशी खंत माजी आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केली.

Mohan Humbarde : काँग्रेसच्या माजी आमदाराचा २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मोहन हंबर्डे हे येत्या २८ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. हंबर्डे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पुढाकार घेतला आहे. हंबर्डे यांचा पक्षप्रवेश अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

NCP Former MLA : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा अपघात झाला आहे. एका दुचाकीवरून जात असताना माल वाहतुकीच्या वाहनाने त्याना जोरदार धडक दिली आहे.

Uday Samant : राजन साळवींसोबत कोणताही वाद नाही

रत्नागिरीतील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील दुसरे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी साळवींबाबत मोठे विधान केले आहे. माजी आमदार राजन साळवी यांच्यासोबत आमचा कोणताही वाद नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Rajan Salvi : राजन साळवी हे एकनाथ शिंदेंबरोबर आनंदाश्रमात दाखल

माजी आमदार राजन साळवी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ठाण्यातील शिंदेंच्या घरी बैठक झाली. ती बैठक संपली असून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राजन साळवी हे आनंदाश्रमात दाखल झाले आहेत. राजन साळवी आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच मोटारीतून प्रवास केला आहे.

स्नेहभोजनाला जाण्यासाठी परवानगी घ्या - आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी देखील आपल्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये आदित्य यांनी परवानगीशिवाय कोणीही एकनाथ शिंदे यांच्या खासदार, मंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाऊ नये, अशी सूचना केल्याची माहिती आहे.

अमोल मिटकरींचे पोलिस आयुक्तांना चॅलेंज

छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांना पुणे पोलिसांनी क्लिन चिट दिली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार, आणि पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना ओपन चॅलेंज दिले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रामजी संकपाळ यांना दत्तक गेले होते व ते कर्माने ब्राह्मण होते हे सिद्ध करावे आणि नंतर सोलापुरकर यांची पाठराखण करावी.', असे ट्विट मिटकरी यांनी केले होते.

Rajan Salvi : राजन साळवी शक्तिप्रदर्शन करणार 

राजन साळवी हे आज (गुरुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशाच्या आधी राजन साळवी शक्तिप्रदर्शन करणार आहेत. साळवी यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी, शिवसैनिक उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जाणार आहेत. 500 गाड्यांमधून कार्यकर्ते पक्ष प्रवेशासाठी येणार आहेत.

राज्यसभेत तुफान राडा, जया बच्चन का संतापल्या ?

वक्फ विधेयकावरील जेपीसी अहवालाबाबत विरोधकांच्या आरोपांवर किरण रिजिजू म्हणाले ...

विरोधकांच्या आरोपावर किरण रिजिजू म्हणाले 'वक्फ विधेयकावरील जेपीसी अहवालातून कोणताही टप्पा वगळण्यात आला नाही',

JPC report on Waqf Bill presented in Rajya  : वक्फ विधेयकावरील JPC अहवाल राज्यसभेत सादर; सभागृहात प्रचंड गोंधळ; कामकाजही झाले स्थगित

वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) अहवाल गुरुवारी राज्यसभेत सादर करण्यात आला. विधेयक सादर होताच सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू झाला. विरोधी पक्षांनी घोषणाबाजी केली आणि सरकार वक्फ बोर्डांना कमकुवत करत असल्याचा आरोप केला. वाढत्या गदारोळामुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

Lok Sabha Latest Update : अदानी ग्रुपवरून विरोधकांकडून सभागृहात गोंधळ, लोकसभा कामकाज सुरु होताच काम तहकूब

अदानी समूहाशी संबंधित एका बातमीवरून विरोधकांकडून लोकसभेत गोंधळ घातला. लोकसभा अध्यक्षांनी वारंवार विनंती करूनही विरोधी सदस्यांनी गोंधळ थांबवला नाही आणि शेवटी त्यांनी लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

Operation Tiger in Delhi : दिल्लीतील डिनर डिप्लोमसीतून शिंदे गटाकडून उद्धव सेना पुन्हा निशाण्यावर

'ऑपरेशन टायगर' ने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली असून पुन्हा एका भूकंपाची चाहुल लागली आहे. राज्यात 'ऑपरेशन टायगर'मधून माजी आमदारांचा पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटात केला जात असतानाच खासदार श्रीकांत शिंदेंच्या डिनर डिप्लोमसीतून ठाकरे गटाचे खासदार गळाला लागले आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरच्या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांनी उपस्थिती लावली. यामध्ये खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Aaditya Thackeray Live Updates: जेवढ्यांना फोडायचं आहे तेवढ्यांना फोडा : आदित्य ठाकरे

राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं 'ऑपरेशन टायगर' सुरू केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनेक नेते फोडले जात आहेत. यावरून आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी शिंदे सेनेला इशारा दिला जेवढ्यांना फोडायचं आहे तेवढ्यांना फोडावं. जे महाराष्ट्र लुटतात त्यांच कधीही कौतुक करणार नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.

Suresh Dhas News : अजित पवारांनी टाळली सुरेश धसांची भेट

बीड जिल्हा नियोजन समितीच्या भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारीसाठी भाजप आमदार सुरेश धस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट मुंबईत घेणार होते. मात्र त्यांनी भेट टाळल्याचे समोर येत आहे.

Aditya Thackeray Latest Updates : कोणी कोणाच कौतुक करावं हा त्यांचा विषय : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली असून ते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत आहेत. मात्र त्यांची भेट घेणं आदित्य ठाकरे यांनी टाळले आहे. तसेच शरद पवार यांना आज भेटणार नसून त्यांच्याशी काहीही बोलण झालं नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी, कोणी कोणाच कौतुक करावं हा त्यांचा विषय आहे. याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. पक्ष फोडण्याच पापा एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Aditya Thackeray Latest Updates : राहुल गांधी यांची भेट घेतली, आता केजरीवाल यांची भेट घेणार

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे मात्र दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली असून आता ते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. याआधी त्यांनी, ही सदिच्छा भेट असल्याचे सांगताना निवडणूक आयोगाचा दिल्ली आणि महाराष्ट्र निवडणुकीत मोठा हात असल्याचा दावा केला आहे

Aditya Thackeray Latest Updates : राज्यात 'ऑपरेशन टायगर' सुरू अन् आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

राज्यात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं 'ऑपरेशन टायगर' सुरू केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर असतानाच आदित्य ठाकरे मात्र दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे राज्यात अनेक तर्क काढले जात आहेत. ते दिल्लीत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे

Parliament Budget Session Live Updates : संसदेत नवीन आयकर आणि वक्फ विधेयक सादर होणार

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संसदेत नवीन आयकर विधेयक आणि वक्फ विधेयक सादर होणार आहे. यादरम्यान विरोधी पक्षाचे खासदार या विधेयकाला आधीच विरोध करत असून दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे.

PM Modi USA Visit News : पंतप्रधान मोदी अमेरिकेत पोहोचले, डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचले असून त्यांचे तेथे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्याशी भेटी घेतील. याआधी ते फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते.

Shinde Committee LIVE : न्या. शिंदे समितीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ

कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील पात्र मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही निश्चित करण्यासाठी शिंदे समिती करण्यात आली आहे. या समितीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते दिल्लीत आपल्या खासदारांशी संवाद साधणार आहेत. तसंच शरद पवारांवर संजय राऊतांनी केलेल्या टीकेनंतर ते आज शरद पवार यांची भेट घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Akola News : मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

अकोल्यातली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसटीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अकोला येथील पातूर तालुक्यातील तूलांगा खुर्द गावात ही तोडफोड केल्याची माहिती आहे. मनसेचे शाखा बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याच्या निषेधार्थ ही तोडफोड करण्यात आली आहे.

Bhakar Karekar passed away : प्रख्यात शास्त्रीय गायक प्रभाकर कारेकर यांचं निधन

प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं दीर्घ आजारानं बुधवारी रात्री निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते यकृताच्या आजारानं ग्रस्त होते. त्यांचं पार्थिव दादर येथील त्यांच्या घरी आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता दादर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Rajan Salvi Join Shivsena : राजन साळवी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार

ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते राजन साळवी हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून आज गुरूवारी (ता.13) ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाण्यात मोठं शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT