भाजप खासदार नारायण राणेंनी शिवसेनेची काँग्रेस झाली असं विधान केलेल्या कट्टर राजकीय विरोधक भास्कर जाधवांचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, जाधव यांचं मत आहे ते खरं आहे, शिवसेना संपली आहे, त्यांचे आमदार, खासदार कोकणात नाहीत. संजय राऊतांबद्दल विचारताच माझा दिवस चांगला गेला, कशाला त्याचं नाव काढता असं उत्तर देत मोजक्याच शब्दांत त्यांचा विषय संपवला.
छत्तीसगडमध्ये 10 दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी जवानांच्या गाडीला लक्ष्य करत स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते.आता भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी (ता.16) दिवसभरात 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. अजूनही या भागात ऑपरेशन सुरुच आहे. शहीद जवानांचा बदला घेतल्याचे समोर येत आहे.
१५ डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दिंडोरीला आश्रमात मुक्कामला होते. आश्रमात जर वास्तविक जागा दिली असेल तर त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करावा. CID पथक तिथे गेले होते पण ते पुढे ते सांगितलं नाही, ते दर्शनासाठी आले होते अस सांगितलं होतं. गृहमंत्री फडणविसांना विनंती आहे की याची चौकशी करावी. असं तृप्ती देसाई म्हणल्या आहेत.
जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेला बॉलिवूड स्टार सैफ अली खान याची भेट भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी घेतली आणि त्याच्या तब्यतीचीही विचारपूस केली. तसेच संबंधित आरोपी पकडण्यासाठी पोलिस यंत्रणा नेमकं काय करत आहे, याबाबत पोलिस आयुक्तांशीही चर्चा केली.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने घरात काम करणाऱ्या महिलेकडून १ कोटी रुपये मागितल्याची माहिती समोर आली आहे. घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या इसमाला महिलेने हटकेल आणि कशासाठी आला आहेत पाहिजे हे विचारले असता त्याने १ कोटी रुपये हवे असल्याची केली मागणी केली. तसेच जोवर पैसै देत नाही तोवर कोणी घराबाहेर पडणार नाही आरोपीने घरी काम करणाऱ्या महिलेला धमकावले. सैफच्या घरी काम करणाऱ्या या महिलेचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्याचा फोटो पोलिसांनी समोर आणला आहे. आरोपी हा घरातून बाहेर पडताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. मध्यरात्री अडीजच्या सुमारास आरोपीने सैफवर हल्ला करत तो घराबाहेर पडला होता. हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात आली होती. .शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसेना मंत्र्यांना केले मार्गदर्शन केले. येणाऱ्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच आपण निवडणुक लढवणार आहोत.राज्यातील सर्व जिल्हा शिवसेना पदाधिकारी आणि जिल्हा परीषद सदस्यांशी यर्व मंत्र्यांनी संपर्क ठेवून तीथल्या समस्या सोडवायच्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले.
हिंदुत्ववादी संघटनांकडून विविध मशिदी तसेच अनेक धार्मिक पुजास्थळांच्या जागांवर दावा सांगत तेथे खोदकाम करण्याची मागणी केली जात आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयात 15 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात असलेल्या धार्मिक स्थळांचे स्वरूप जपणाऱ्या 1991 च्या पूजास्थळे (विशेष तरतुदी) कायद्याविरुद्ध याचिक दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, दाखल केलेल्या खटल्यांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करत काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांग्लादेशी नागरिकांच्या अवैध घुसखोरीविरोधात आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देले. अवैधरित्या आलेल्या बांगलादेशी नागरिकांना आत्तापर्यंत 2024 मध्ये पुण्यामधून 60 जन्माचे दाखले देण्यात आल्याची शक्यता आहे. सर्व बांगलादेशी नागरिकांना ओळखून त्यांना परत पाठवण्याचं काम करण्यात येणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुंबई असुरक्षित झाल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. मुंबई असुरक्षित म्हणणे योग्य नाही. विरोधकांचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच सैफ अली खानवरील हल्ल्याचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
चाकण-शिक्रापूर रस्त्यावर गुरूवारी दुपारी भीषण अपघात झाला. एका कंटेनरने रस्त्यावरील 20 ते 25 वाहनांना धडक दिल्याने खळबळ उडाली. जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरात कंटेनरने वाहने उडवली आहेत. यामध्ये पोलिसांच्या वाहनाचाही समावेश आहे. अपघातानंतर पळून जाणाऱ्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुदैवाने या अपघातातही जीवितहानी झालेली नाही.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयाने आज आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजूरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक झाली.
माजी उपसरपंचांच्या कारला काळ्या काचा असल्याने ती पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय या गाडीवर 23हजाराचा दंड देखील थकीत होता, अशी माहिती आता समोर आली आहे. फर्ग्युसन रस्त्यावर एक काळ्या रंगाच्या काचा असलेली कार रस्त्यावरून फिरताना दिसतात सजग नागरिकाने अमितेश कुमार यांना त्याचा व्हिडिओ पाठवला. त्यानंतर आयुक्तांनी गाडीच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अमोल कारले यांच्या नावावर असलेली ही कार वारजे पोलिसांनी ताब्यात घेतली.
सिने अभिनेते सैफअली खान यांच्यावर बुधवारी मध्यरात्री चाकूहल्ला झाला होता. हल्लेखोर हा चोरीच्या उद्देशाने सैफअली खानच्या बंगल्यात शिरला असावा, असे प्रथमदर्शनी तपासात दिसून येत आहे. हल्लेखोराच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी दहा पथकांची तातडीने स्थापन करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या तपासात सैफअली खानवर हल्ला करणारा हल्लाखोराचे लोकेशन मुंबईच्या प्रभादेवी ट्रेस झाला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
सैफअली खान यांच्यावर झालेल्या चाकूहल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने हलविण्यास सुरुवात केली आहे. चोरी करण्यासाठी सैफअली खान यांच्या घरी चोर शिरल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असे मुंबई पाेलिसांनी सांगितले. दरम्यान, हल्लेखोराच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी मोठे पाऊल उचलेले असून दहा पथकांची तातडीने स्थापन करण्यात आले आहे. ते पथक कामाला लागल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
संतोष देशमुख खून प्रकरणी वाल्मिक कराड याला मोका लावल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे प्रथमच परळीत दाखल झाले आहेत. मंत्री झाल्यानंतरही ते बहुधा प्रथमच परळीत आले असावेत. परळीत आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी वैजनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.
नाशिक जिल्हा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच संतापल्याचे दिसून आले. कालवा सल्लागार समितीची बैठक आहे, असे माहिती असूनही अधिकारी अनुपस्थित आहेत. अधिकाऱ्यांना बैठकींचं गांभीर्य नाही, हे दुर्दैवी आहे. बिगर सिंचनाचं पाणी कमी करून सिंचनाचे पाणी वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण पाण्याची उधळपट्टी आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
मीरा भाईंदर शहरातील अनाधिकृत बांधकामाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मनसेने प्रभाग कार्यालयाजवळ आंदोलन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग समिती कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. तत्पूर्वीच प्रभाग अधिकारी सुधाकर लेंडवे यांनी आपले कार्यालया सोडून पळ काढला आहे. मनसेच्या आंदोलनाला सुरुवात होतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बारामती येथील कृषक कृषी प्रदर्शनात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 03 मार्चपासून सुरू होणार आहे, असे सांगितले. तसेच राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी सादर केला जाणार आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भाषणातून दिली.
सैफ अली खानच्या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु. मुंबई गुन्हे शाखेच्या आठ टीम तपासात जुंपल्या असून एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक देखील तपास करत आहेत.
लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मकर संक्रातीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्याप जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचा कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्यासाठी महिलांना वाट पाहावी लागणार आहे.
सैफ अली खानवर यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. यांबाबत कुटुंबिय आणि त्याच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलंय.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे.
शरद पवार म्हणाले, व्यवस्था किती ढिसाळ झाली हे दिसतंय. दुसऱ्यांदा असा प्रयत्न झालाय, मुख्यमंत्र्यांनी याकडे अधिक गांभीर्याने पाहावं. मुंबईतली कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. असल्याचं शरद पवार म्हणाले.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकच्या नियोजन भवनात महत्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत जलसंपदा अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त बैठकीला उपस्थित आहेत. त्यासोबतच खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार बैठकीला उपस्थित आहेत.
या बैठकीत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पाणी प्रश्ना संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्याला 7% पाणी कमी देण्याची शिफारस गोदावरी अभ्यासगटाने महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाला अहवाल दिला होता त्यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बारामती येथे कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ही भेट होणार असून संवाद साधणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
पुण्यातील 23 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या झाल्या असून. या बदल्या पोलीस आयुक्तालयाअंतर्गत करण्यात आल्या आहेत. वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या एकाच मंचावर आल्या असून दोन्ही नणंद-भावजय या शेजारी-शेजारी बसल्या आहेत. बारामती लोकसभेची निवडणूक त्यांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती. कृषी प्रदर्शन कार्यक्रमात त्या एकत्र आल्या आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
बीडपासून-मुंबईपर्यंत राज्यातील कायदा, सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याची संतप्त प्रक्रिया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. अभिनेता सैल अली खान यांच्या आज पहाटे चोराने चाकूनं हल्ला केला. यानंतर राऊत माध्यमाशी बोलत होते. सैफ याच्यावर सहा वार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सैफ यांच्या घरातील तीन नोकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा निषेध सर्वच स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूर केली आहे. सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या हल्ल्यानंतर सरकारवर तोफ डागली आहे.
उद्योगपतींनी आपल्या अहवालामुळे अडचणीत आणणारी हिंडनबर्ग ही अमेरिकन रिसर्च कंपनी बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीचे संस्थापक नेथन ऊर्फ नेट अँडरसन यांनी ही कंपनी बंद केल्याची घोषणा केली आहे. फॉरेन्सिक फायनान्स रिसर्च, वित्तीय अनियमिततांचा तपास आणि विश्लेषण, अनैतिक व्यावसायिक पद्धतीने आणि गुप्त वित्तीय प्रकरणांची चौकशी ही रिसर्च कंपनी करत होती.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात शिरलेल्या चोराने चाकू हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर त्याच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
उल्हासनगरमध्ये कार पार्किंगवरून झालेल्या वादातून बाहेरून गुंड आणून एका कुटुंबाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर मारहाण झालेल्या व्यक्तीच्या वयोवृद्ध वडिलांनी हे भांडण पाहताच त्यांचा रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषिक या शेतीविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्त बारामतीत निवडणुकांनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.