महाराष्ट्र

Maharashtra Politics News live : कर्नाटकला जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आदेश

Sarkarnama Headlines Updates: राज्य व देशातील राजकीय व प्रशासकीय बातम्या वाचा एका क्लिकवर...

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूरातून कर्नाटकला जाणाऱ्या बस रद्द

परविहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूरमधून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. महराष्ट्रातील बस चालकास मारहाण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

'राज ठाकरे महायुतीत आले तर...' रामदास आठवलेंचं विधान

महायुतीत आम्हाला काही मिळत नाही. राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर आम्हाला अजून काही मिळणार नाही' असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे.

Pune Shivsena : पुण्यातील शिवसैनिक झाले आक्रमक

कर्नाटकात महाराष्ट्रातील बसला काळे फासण्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला होता. त्या प्रकारानंतर पुण्यात उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. येथील लक्ष्मी नारायण टॉकीज चौकात शिवसैनिकानी कर्नाटकाच्या बसला काळे फासले. त्यासोबतच कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणानंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Suresh Dhas : मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

भाजप आमदार सुरेश धस यांनी शनिवारी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची तसेच तेथील ग्रामस्थांनी भेट घेतली. आपल्या भेटीनंतर त्यांनी मोठा दावा केला आहे. मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर ते परळी येथे दाखल झाले. परळीत दाखल झाल्यानंतर नागरिकांनी आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले.

15 सेकंदाचं वक्तव्य भोवलं; नवनीत राणांना हैदराबाद कोर्टाचे समन्स

तुम्हाला 15 मिनिट लागतील तर आम्हाला 15 सेकंद लागतील, हे खासदार असदुद्दीन औवेसी यांच्याविरोधात केलेले वक्तव्य भाजप नेत्या नवनीत राणा यांना भोवलं आहे. या वक्तव्याविरोधात हैदराबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टाने राणा यांना समन्स बजावले आहे. यात 28 फेब्रुवारी रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बालभारती-पौडफाटा रस्त्याचा मार्ग मोकळा

वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा प्रस्तावित असलेल्या रस्त्याच्या कामाला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे बालभारती-पौडफाटा रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महादेव मुंडे खून प्रकरणातही आकाचा हात - सुरेश धस

सरपंच संतोश देशमुख यांच्याशिवाय महादेव मुंडे खून प्रकरणातही आकाचा हात असणार असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मोदींची इच्छा असेल तेव्हा आदित्य ठाकरेंना अटक होईल...

आदित्य ठाकरे मंत्री असताना दिशा सालियानच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी पार्टीही अटेंड केली होती. त्यानंतर तिने आत्महत्या केली. मी त्यावेळी नसतो तर त्याचवेळी आदित्य ठाकरे यांना अटक झाली असती, असा खळबळजनक दावा शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा बदलली तर ते आताही आदित्य ठाकरे यांना अटक करू शकतात, असे ते म्हणाले. साम'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

कन्नड संघटनांना जशास तसे उत्तर देणार - मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा

शुल्लक कारणावरून नेहमीच कन्नड संघटना गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस चालकाला कन्नड संघटनांनी काळे फासल्याची घटना अतिशय निंदणीय आहे. कन्नड संघटनांना येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला आहे.

बेळगाव आणि सीमा भागातील मराठी भाषिकांवर दादागिरी करून कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटना अन्याय करीत आहेत. याची महाराष्ट्र सरकारने लवकर दखल घेतली पाहिजे. गेली अनेक वर्षे लोकशाहीच्या मार्गातून महाराष्ट्रात जाण्यासाठी मराठी भाषिक लढा देत आहेत त्याला महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेने साथ दिली पाहिजे.

कन्नड संघटनाना प्रशासनाने आवर घालावा अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीलाही आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे, असेही किणेकर म्हणाले.

Nitesh Rane : भास्कर जाधवांकडे केवळ सतरंज्या उचलायचे काम

भास्कर जाधवांकडे सतरंज्या उचलण्याशिवाय दुसरे काम आता नाही. कारण ते सिनिअर असताना देखील विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांच्याकडे नाराजी शिवाय दुसरा पर्याय नाही, अशी टीकाभाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.

Eknath shinde meet Amit shah : एकनाथ शिंदेंनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट

गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. गृह विभागाच्या विभागीय बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत, अमित शहांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Karnataka dispute : मराठी एसटी चालकाला मारहाण, कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक थांबवली

कन्नड कार्यकर्त्यानी मराठी एसटी आणि चालकाला काळे फासल्याने तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये होणारी एसटीची वाहतूक तात्पुरती थांबवली आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी दहा नंतर कोल्हापुरातून कर्नाटकला जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. परिस्थिती पाहून एसटी सुरू केली जाणार असल्याची माहिती

Suresh Dhas : डॉ. वायभसे याला सहआरोपी करा- सुरेश धस

भाजप आमदार सुरेश धस मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेश धसांवर प्रचंड टीका झाली. यानंतर ते आज पहिल्यांदाच मस्साजोगमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी पोलिस अधिकारी महाजन आणि पाटील हे सहआरोपीच झाले पाहिजेत आणि डॉ. संभाजी वायभसे याला देखील सहआरोपी करा, अशी मागणी केली.

GBS : GBS मुळे नागपूरमध्ये आणखी एका 32 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

GBS आजारामुळे नागपूरमध्ये आणखी एका 32 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मागील दोन महिन्यातील हा GBS ता तिसरा बळी आहे.

Maharashtra Karnataka dispute : कन्नडीगांचा उन्माद! चालकाला कन्नड येत नसल्याने तोंडाला फासले काळे

कन्नडीगांचा उन्माद महाराष्ट्रासाठी नवा नाही. अशातच आता कन्नडीगांनी पुन्हा धुडगूस घातला आहे. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येत नसल्याने चक्क त्याच्या तोंडाला काळे फासल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिवाय बसला देखील काळे फासलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक वाद पेटण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray and Vicky Kaushal : राज ठाकरे आणि अभिनेता विकी कौशल एकाच मंचावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि छावा सिनेमातील प्रमुख कलाकार अभिनेता विकी कौशल एकाच मंचावर मराठी कविता वाचन करणार आहेत. शिवाजी पार्कवर येत्या मराठी भाषा दिनानिमित्त मराठी ते कविता वाचन करणार आहेत.

Amit Shah News : अमित शाह पुण्यात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री ते पुण्यात दाखल झाले. या दौऱ्यात ते आज 11 वाजता पश्चिम गृह विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसंच हडपसर येथील विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपालाही ते उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती पुणे वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT