उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तीनवेळी त्यांची भेट घेत चर्चा केली. शिवाय ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांचाही फडणवीसांबद्दलचा सूर काहीसा बदललेला दिसत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत, उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा, अशी मागणी करणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांना जयंत पाटील यांनी आव्हान दिले आहे. पुढच्या दोन दिवसात प्रत्येकाने आपल्या वॉर्डात पक्षाला किती मते दिली त्याचा डेटा द्या, आठ दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
आगामी काळात आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू. त्यात मुंबई महापालिका निवडणुकीचा समावेश असेल, असे विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केले आहे. नीतेश राणे हे कोणतेही खाते सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, असा दावाही राणेंनी केला. ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर असतील पक्ष त्यांचा निश्चितपणे विचार करेल. दरम्यान, ज्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशींना जन्माचा दाखला दिला आहे, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी नारायण राणेंनी केली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडचा बिहार झाल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. त्याच धर्तीवर बीड पोलिसांनी आता 2024 मधील संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांची आकडेवारीच समोर ठेवली आहे. त्यानुसार, जिल्ह्यात 2024 या वर्षभरात 40 खून, आणि 191 हे खुनाचे प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.कराडच्या डोळे तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची एक टीम दाखल झाली होती.डोळ्यांना संसर्ग होण्यापाठीमागं झोप पूर्ण होत नसल्याचं कारण असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
कोल्हापूर ठाकरे गटाचे शिवसेना शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी दाखल केलेली राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची याचिका फेटाळली आहे. हा न्यायालयानकडून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षासह महाविकास आघाडीलाही मोठा झटका मानला जात आहे.
संतोष देशमुख हत्या - बीडमधील पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परळीत ओरिजिनल पोलिसांकडून तपास होत नाही. सीआयडीतील पोलिसांची नियुक्ती करावी, असा टोला धस यांनी लगावला आहे. आकांनी खूप संपत्ती जमवल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांचे नाव न घेता धस यांनी केला.
वाल्मिक कराड संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराडच असल्याचं समोर आलं आहे. खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या कराडचं पद अजूनही कायम असून धनंजय मुंडेंनीच त्याची या योजनेचा अध्यक्ष म्हणून शिफारस केल्याचंही आता समोर आलं आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल असतानाही त्याला हे पदं कसं दिलं यावरून नवा वाद सुरू झाला आहे.
2022 मध्ये वाल्मिक कराडला ईडीची नोटीस आली होती. तरीही त्याच्यावर ईडीने कारवाई का नाही? असा सवाल करतच कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार का आहेत? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना एक आणि कराडसाठी दुसरा कायदा का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. तसंच वाल्मिक कराडचा विषय राजकीय नाही तो सामाजिक विषय आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंबईतील विविध समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे ठाकरेंनी सांगितले. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरची ठाकरेंचीही ही तिसरी भेट होती.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दादर येथील टोरेस कंपनीच्या कार्यालयात झाडाझडती सुरू केली आहे. कंपनीच्या लॉकरमध्ये पाच ते सहा कोटी रुपयांची रोकड असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने काही हजार कोटी रुपयांची गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.
वांद्रे परिसरातील भारतनगरमधील 178 घरांना एसआरएसची नोटीस आली आहे. त्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भारतनगरमध्ये आंदोलन केले जात आहे. स्थानिक आमदार वरुण सरदेसाई या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
टोरेस घोटाळ्याला वेगळं वळण लागलं असून या घोटाळ्याची माहिती कंपनीचा माजी सीईओ तुआसेफ रेयाज याने आधीच तपास यांत्रणाना दिली होती, असा दावा आता केला जात आहे. त्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तपास यंत्रणांना मेल केला होता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हफ्ता थकल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली होती, अशी चर्चा आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील विविध समस्यांबाबत आदित्य टाकरे हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आज धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, आरोपींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कठीण परिस्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कष्ट करुन 8 खासदार निवडून आणले, त्यातले काही जण सोडून जात असतील तर ते रावणाचे वंशज आहेत, अशा शब्दांत ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला.उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल, कोणी पक्षातून फुटत असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील, असे राऊत म्हणाले.
लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचे थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. १००० कोटींच्या टोरेस घोटाळ्याला वेगळं वळण लागलं आहे. माजी सीईओ तुआसेफ रेयाज यांनी आधीच तपास यंत्रणाना सतर्क केल्याचा दावा केला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तपास यंत्रणांना मेल लिहून सतर्क केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर मास्टरमाईंड युक्रेनला पळून गेल्याचे समजते. अटक केलेल्यांमध्य एक जण रशिया तर दुसरा उझबेकिस्तनामधील आहे.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची ताकद जास्त आहे. दिल्लीमध्ये आप हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे दिल्लीत ठाकरे गट काँग्रेसऐवजी आपला पाठिंबा देणार आहे, याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. महाराष्ट्रात आम्ही काँग्रेससोबत आहोत, पण दिल्लीत आम्ही आपच्या सोबत राहू, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. इंडिया आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरती आहे, असे राऊतांनी स्पष्ट केले आहे.
Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात साखर संकुल येथील प्रादेशिक कार्यालयाच्या कामाचा आढावा घेणाऱ्या बैठकीला उपस्थित आहेत. अजितदादा साखर संकुलाचत येताच याठिकाणी काही काळ वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ झाली. अजितदादा यांच्या हस्ते नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील भुवनेश्वर येथे 18 व्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाचे उद्धघाटन करणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी भारतात परत आले होते. यानिमित्ताने या दिवसाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात 50 पेक्षा अधिक देशाचे नागरिक उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी 3 दिग्गज नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि कोथरूडचे आमदार तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे तिन्ही नेते कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता महायुतीतील वरिष्ठ नेते नेमकं कोणाला कोल्हापूरचं पालकत्व देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दिल्लीतील शाह यांच्या निवासस्थानी आज ही भेट होणार आहे. नुकतंच सुजय विखे यांनी शिर्डीत येणाऱ्या भिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. अशातच आता ते शहांची भेट घेणार आहेत. तर 12 जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
सीआयडीकडून वाल्मिक कराडचे 3 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या 3 मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. सीआयडीकडून कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडचे मोबाईल जप्त केले असले तरी अद्याप विष्णू चाटेचा मोबाइल तपास पथकाला मिळालेला नाही. विष्णू चाटेचा मोबाईल मिळेपर्यंत कराडने खंडणीसाठी फोनवर बोलल्याचे स्पष्ट होणार नाही? अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.