Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Budget 2026 LIVE Updates : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली; महाराष्ट्राच्या वाट्याला काय?

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार, यासह आज 01 फेब्रुवारी 2026 रोजीच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

Budget Impact News : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स 2,300 ने घसरला

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. शेअर बाजार 2,300 पेक्षा जास्त ने कोसळला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाल्याचे काही अंशी दिसत आहे.

Budget 2026 Live : बजेटनंतर 'या' गोष्टी स्वस्त होणार? 

कर्करोग, मधुमेह ची औषधे आणि इतर सात आजारांवरील औषधे स्वस्त होणार.

शूज, बॅटरी आणि मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त होणार.

सौरऊर्जेशी पुरक संबंधित उत्पादने स्वस्त होणार आहेत.

संरक्षण क्षेत्रात मूलभूत सीमाशुल्क माफ होतील.

चामडे आणि कापड निर्यात करणे स्वस्त होतील.

Budget 2026 Live : अर्थसंकल्पीय बजेटमधील काय आहेत मोठ्या घोषणा 

पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयांसाठी अनुदान योजना

15 पुरातत्वीय स्थळे जीवंत स्थळे म्हणून विकसित केली जातील

ईशान्येकडील 5 राज्यांमध्ये पर्यटन स्थळांचा विकास

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी स्थापन केली जाईल

औद्योगिक कॉरिडॉरमध्ये पाच विद्यापीठ टाउनशिप

प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे वसतिगृह

ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी योजना

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची योजना

खेलो इंडिया मिशन

टीसीएस परदेशी टूर पॅकेजेसमध्ये 2 टक्क्यांनी वाढ करणार

डिजिटल नॉलेज ग्रिडवरील पर्यटन स्थळांची माहिती

Agriculture Budget Live : बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय? 

शेतकऱ्यांसाठी काय ? 

चंदन लागवडीला प्रोत्साहन, नारळ संशोधन केंद्र स्थापन करण्याची महत्वकांक्षी घोषणा

  • नारळ संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा यामध्ये 3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार अशी माहीती.

  • पशूपालन दुग्धव्यवसायासाठीचे अनुदान वाढवणार 

  • काजू, कोको ब्रँड जागतिक दर्जा मिळवून देणार 

  • शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न 

  • 500 एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार 

  • दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन अधिक मजबूत करणार

  • चंदन, नारळ आणि काजू या पिकांना चालना देणार

  • ईशान्य भारतात बदाम आणि शेंगदाण्याचे उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर

  • चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यात येईल.

  • आयातीवर अवलंबत्व कमी करणार

  • मत्स्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार

    नारळ उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक असून सुमारे 3 कोटी लोकांचे उपजीविका या क्षेत्रावर अवलंबून आहे.
    नारळ क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रस्ताव मांडण्यात येत असून, सरकारकडून आवश्यक मदत दिली जाईल.

Budget 2026 Live: 1 एप्रिलनंतर देशात नवा आयकर कायदा लागू होणार 

  • 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन यांची घोषणा

१ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. काय होणार फायदा... आयटीआर फाइल करणे सोपे सहज होणार.

  • अपघात विमा करमुक्त करणार

  •  सेमी कंडक्टरसाठी 40 हजार कोटी 

  • शुगर आणि कॅन्सरचे औषधोपचार स्वस्त 

  • मुंबई- पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर 

  • 20 नवे जलमार्ग बनवणार 

  • बॅकिंग क्षेत्राच्या विकासासाठी नवी समिती 

 Budget 2026 Live : मंदिरांसाठी 5000 कोटी रुपयांची तरतूद- अर्थमंत्री सितारामन यांची घोषणा

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले की, मंदिरांसाठी 5000 कोटी रुपयांची तरतूद केली आली आहे. टियर 2 आणि 3 मधील शहरांना याचा फायदा होणार आहे.

राज्यांसाठी 1.4 लाख कोटींची तरतूद- निर्मला सितारामन

2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यांसाठी 1.4 लाख कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहीती सीतारमन यांनी दिली आहे. यानुसार राज्यांना आर्थिक स्वरुपाचे नियोजन करावे लागणार आहे.

NCP News : प्रफुल्ल पटेल 'राष्ट्रवादी काॅंग्रेस' च्या अध्यक्ष पदी केंद्रिय मंत्री पीयुष गोयल यांचं विधान 

राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आता प्रफुल्ल पटेल आहेत, असं विधान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी केले आहे. PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही विधान केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरण होईल असं वाटत नसल्याचे देखील गोयल यांनी म्हंटले आहे. त्यांच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, गोयल यांना नियुक्तीची माहीती कुठून मिळाली याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

Budget Speech 2026 Live : मुंबई- पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरु करणार- अर्थमंत्री सितारामन

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा झाली आहे. यामध्ये मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. 7 नवीन हायस्पीड सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.हे. पुणे -हैदराबाद कॉरिडोरचाही यामध्ये समावेश असणार आहे.

 Budget 2026 Live: कर्करोग आणि मधुमेहाची औषधे स्वस्त होणार : अर्थमंत्री सीतारमन

Health Sector Union Budget News Update : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली की, देशातील बायोफार्मास्युटिकल क्षेत्राच्या विकासामुळे कर्करोग आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवरील औषधं स्वस्त होणार. तसेच सीतारमन यांनी 10,000 कोटी रुपयांचा एसएमई ग्रोथ फंडही जाहीर केला. भविष्यातील नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि निवडक निकषांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार 10,000 कोटी रुपयांचा समर्पित एसएमई ग्रोथ फंड सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत असल्याचं त्यांनी जाहीर केले.

Budget 2026 Live:  5 वर्षात 20 नवे जलमार्ग सुरु करणार, अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची घोषणा

येणाऱ्या 5 वर्षात नवीन जलमार्ग सुरु करणार अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. 20 नवे जलमार्ग सुरु करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाराणसी, पाटण्यात जहाजबांधणी केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Budget 2026 Live: आत्मनिर्भर भारतसाठी 2 हजार कोटींचं टॉपअप- अर्थमंत्री सितारामन यांची घोषणा

आत्मनिर्भर भारत योजनेसाठी 2 हजार कोटींचं टॉपअप दिले जाणार असल्याची माहीती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.

FM Nirmala Sitharaman Budget Speech LIVE: संत रविदासांचे नाव घेत अर्थमंत्री सीतारमण यांनी भाषणास केला प्रारंभ

Nirmala Sitharaman Budget LIVE Update : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संत रविदासांचे नाव घेत आपल्या भाषणाला प्रारंभ केला. अर्थमंत्र्यांनी देशांतर्गत उत्पादन, ऊर्जा सुरक्षा, दारिद्र्य निर्मूलनापासून ते रोजगारापर्यंतच्या मुद्द्यांवर भर दिला.

Union Budget 2026 Live : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्या नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. देशाच्या नजरा या अर्थसंकल्पावर लागल्या आहेत. अर्थमंत्री त्यांच्या पोतडीतून सर्वसामांन्यांसाठी काय काढतात सर्वांसाठी उत्सुकतेचे आहे.

Union Budget 2026 Liive Update : पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार का? कमी होणार? अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा

अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींबाबतही निर्णय होऊ शकतो. पेट्रोल डिझेलच्या दरावर सध्या जीएसटी आकारला जात नाहीये. जीएसटी आकारण्याची मागणी केली जात होती. जर समान जीएसटी दर आकारला तर पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील. दरम्यान, याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Union Budget News : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच डिफेंस स्टॉक्स ला बढती  

अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज (ता.01) सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामुळे संरक्षण क्षेत्रात मोठी संधी निर्माण होऊ शकते. या गोष्टीचा अंदाज घेऊन, आज सकाळी संरक्षण शेअर्समध्ये निर्णायक वाढ झाली. सकाळी 10:15 वाजेपर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढले होते. पारस डिफेन्सचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढले. सुरुवातीच्या व्यवहारात डेटा पॅटर्नचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक वाढले.

Nirmala Sitharaman LIVE: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ

Union Budget LIVE: अर्थसंकल्प सादर होणार आहे. शेअर बाजारातील अपडेट्स येत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादर होण्याच्या दिवशी, सेन्सेक्स 82,328.15 अंकांवर आहे, तर निफ्टी 25,314.60 वर आहे. दरम्यान, सरकारी सूत्रांनुसार, जानेवारी 2026 मध्ये जीएसटी संकलन 1,93,384 कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा हे 6.2% वाढ पहायला मिळत आहे.

Union Budget 2026 : जुनी कर प्रणाली रद्द होणार? अर्थसंकल्पात निर्णय होण्याची दाट शक्यता

अर्थसंकल्पात टॅक्ससंदर्भात अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये जुनी कर प्रणाली रद्द केली जाऊ शकते. परंतू याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.

'विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा अर्थसंकल्प'; शिवराज सिंह चौहान संसदेत पोहोचले.

आज (ता.01) संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासाठी केंद्रिय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान पोहोचले आहेत. त्यांची पहीली प्रतिक्रिया.

Union Budget 2026 News LIVE: PM मोदी संसद भवनात दाखल  

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळ अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देतील, आणि तो नंतर सभागृहात मांडला जाईल. याअगोदर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थसंकल्पाबद्दल अभिनंदन करण्यासाठी परंपरेप्रमाणे दही आणि साखरेचा गोड पदार्थ दिला.

निर्मला सीतारमन राष्ट्रपती भवनातात दाखल

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाल्या आहे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज सांगलीत प्रचार सभा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवस प्रचार थांबवल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झेडपी निवडणुतीच्या प्रचारासाठी आज सांगलीत जाणार आहेत. सांगलीतील वाळव्यात आज ते प्रचार सभा घेणार आहेत.

लोकप्रियता जास्त होती, पण अजितदादांना नशिबाने त्यांना साथ दिली नाही - राऊत

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरात लिहिलं की, अजित पवार महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले. हा विक्रम आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, पण ते होऊ शकले नाहीत. अजितदादांनी ज्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केले त्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दादांचा अनुभव, आवाका, लोकप्रियता जास्त होती, पण नशिबाने त्यांना या बाबतीत साथ दिली नाही. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपच्या सोबत गेले व मुख्यमंत्री झाले. यावर दादा गमतीने म्हणाले, “ही ऑफर मला आली असती तर शिंद्यांच्या आधी मी गेलो असतो!” पण भाजपच्या सोबत दादा गेले व उपमुख्यमंत्री पदावरच स्थिरावले. ते भाजपबरोबर गेले, पण विचारांची चौकट मोडली नाही. उदारमतवादी, निधर्मी म्हणूनच ते काम करीत राहिले. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांप्रमाणे ते नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात हजेरी देण्यासाठी गेले नाहीत. ते लवचिक होते, पण फार झुकले नाहीत,' असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

निर्मला सीतारमन कर्तव्य भवनात दाखल

अर्थमंत्री निर्मला सीतारमन नवी दिल्लीतील कर्तव्य भवनातील अर्थ मंत्रालयात दाखल झाल्या आहेत. त्यानंतर त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अर्थसंकल्पाची प्रत सादर करणार आहेत. त्यानंतर अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तो 11 संसदेत सादर केला जाईल.

Budget 2026 : आजच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय घोषणा होणार? 

आजच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय घोषणा होतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. शिवाय या अर्थसंकल्पात सोने-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Budget 2026 LIVE Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडतील.11 वाजता निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT