छत्रपती संभाजीनगर महापालिकेत उपमहापौरपदावरून शिवसेनेत नाराजीनाट्य रंगले आहे. एकाच पदासाठी शिवसेनेतूनच दोन अर्ज दाखल झाले आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी अर्ज भरायला लावल्याची चर्चा आहे. दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या समर्थकानेही उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे शिवसेनेतील नाराजी नाट्य चव्हाट्यावर आले आहे.
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे यांची, तर उपमहापौरपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मनोज चौधरींची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आलेली आहे.
मला कोणी डिवचलं आणि माझ्या नादाला लागला तर मीसुद्धा छत्रपतींची औलाद आहे, हे लक्षात ठेवा. वेळ आली तर मी कोणालाच सोडणार नाही, असा सज्जड इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.
ओला-उबर आणि रिक्षाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ७ फेब्रुवारीला कॅब आणि रिक्षा चालकांचा संप असणार आहे. कॅब ड्रायव्हर आणि रिक्षा चालकांनी बंदची हाक दिली आहे. खाजगी कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारणी आणि बेकायदा बाईक टॅक्सी सेवांच्या निषेधार्थ हा संप पुकारला आहे. महाराष्ट्र कामगार सभा आणि भारतीय गिग कामगार मंचाने बंदची हाक दिली आहे. परिवहन विभाग बेकायदेशीर सेवांवर कारवाई करत नसल्याचे संघटनांन म्हटलं आहे. यामुळे राज्यातील ओला, उबर, रॅपिडो, रिक्षा सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो.
नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांची निवड झाली आहे. हिमगौरी यांनी सीमा पवार यांना माघार घेण्याची विनंती केली. त्यानंतर पवार यांनी माघार घेत माघार पत्रावर स्वाक्षरी केली. त्यामुळे हिमगौरी यांची बिनविरोध निवड झाली.
पिंपरी-चिंचवडच्या महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे यांची महापौरपदी निवड झाल्याची औपचारिक घोषणा बाकी आहे. विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने बिनविरोध निवड झाली.
शरद पवार हे बारामतीमधील अजित पवारांच्या सहयोग सोसायटीमधील घरी पोहचले आहेत. आज अजित पवार यांच्या दशक्रिया विधी आहे. हा विधी घरगुती असून फक्त पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित आहेत.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे तब्बल 66 हजार जमीन विकून एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वसईतील नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेमंत पाटील, धर्मेश शहा, दिपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि इतर साथीदारांविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेतील पराभवानंतर राज ठाकरे पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना संघटनात्कम बांधनी मजबुत करण्याचे आदेश दिले आहेत. 2029 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आत्तापासून करण्याची सुरुवात देखील मनसेने केली आहे.
लोकभेत नरेंद्र मोदी आले नाहीत. त्यावरून राहुल गांधी ट्विट करत नरेंद्र मोदींना टोला लगावला. ते म्हणाले, प्रश्नांना इतके का घाबरता, सत्याची इतकी भीती वाटत होती की त्यांना जे योग्य वाटले तेच केले.
टँकर अपघातानंतर पुन्हा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुक कोंडी झाली आहे. विकएन्डमुळे एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या वाढली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गीकेवर वाहतुक कोंडी झाली असून खंडाळा येथे बायपाय करीत दोन्ही मार्गावरून पुण्याकडे वाहन सोडण्याचा प्रचाशासनाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गटनोंदणी झालेली नाही. वैधानिक समित्यांमध्ये विरोधकांवर मात करण्यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेण्याची रणनीती महायुतीने आखली आहे, मात्र तांत्रिक मुद्द्यांमुळे ही प्रक्रिया रखडल्याची चर्चा आहे.एकनाथ शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांना सोबत घेऊन संयुक्त गट तयार करण्याचा तयारी असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.