सलमान खानच्या RSS कार्यक्रमातील उपस्थितीवर प्रसाद ओक यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. प्रसाद ओकनं व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. प्रसाद ओक म्हणाला, "हे दृश्य खूपच इंटरेस्टिंग वाटलं. सलमान खानचं संघाच्या कार्यक्रमात येणं, हे एकप्रकारे संघाच्या कार्याप्रति त्याने दाखवलेला सन्मान आहे, असं मला वाटतं. त्याने या कार्यक्रमात हजेरी लावली, हे मला खूप आवडलं".
राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे मोहन भागवत यांनी संघात कोणाची निवड करताना जात पाहिली जात नाही, असे स्पष्ट केले आहे. एससी/एसटी असणे हे 'डिस्कॉलिफिकेशन' नाही किंवा ब्राह्मण असणे हे 'क्वालिफिकेशन' नाही. जो उपलब्ध आहे आणि सर्वोत्तम आहे, त्याला जबाबदारी दिली जाते, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे.
अमेरिका-भारत करारावर मोदी सरकारवर विरोधक जोरदार टीका करत असताना मोहन भागवत यांनी मोदींची पाठराखण करत, कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, "आपण जे घेणार आहोत ते परीक्षा करून घ्यायला हवं. आपलं नुकसान होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं. जगभरातून जे ज्ञान येत आहे ते आपल्याला घ्यायलाच हवं. ज्यावेळी करार होतात, त्यावेळी काहीतरी द्यावं लागेल, त्यावेळी काहीतरी आपल्याला मिळेल. सध्याचं जे देशाचं प्रशासन आहे, ते लढणारं आणि ठामपणे उभे राहणारं आहे. त्यामुळे अपेक्षा एवढीच आहे की आपलं कमीत कमी नुकसान व्हावं."
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यावेळी म्हणजे 2029 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपसोबत येतील. तर सध्या सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले सर्व शिलेदार घेऊन शरद पवार यांच्याशी युती करतील, असा खळबळजनक दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कारासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, "मी त्या समितीत नाही. त्यामुळे मला माहिती नाही. परंतु जर तो सन्मान त्यांना मिळाला, तर त्या पुरस्काराचं महत्व वाढेल. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सावरकर यांना भारतरत्न मिळावा."
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चर्चा सुरू असतानाच, विजयपूर जिल्ह्यात एक हलके प्रशिक्षण विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर जवळ असलेल्या मंगळूरू गावाच्या परिसरात हे विमान जमिनीवर कोसळले. प्राथमिक माहितीनुसार इंधन संपणे किंवा तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे. या अपघातात सहाय्यक फ्लाइट इन्स्ट्रक्टर कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम संकर हे दोघे जखमी झाले असून, त्यांना अधिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या धक्क्यातून अनेक जण अजूनही सावरलेले नाहीत. यात बीडच्या माजलगाव इथं पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लखन थावरे यांच्या विवाहात वधू-वरांनी मंगलाष्टका सुरू होण्यापूर्वी दिवंगत अजित पवारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. लखन थावरे यांचा आपल्या नेत्याविषयी असलेला प्रेमाची चर्चा मंडपासह बीडमध्ये होत आहे. शोक आणि संस्कार यांची सांगड घालणारा हा विवाह सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी परीक्षा केंद्रात जाणाऱ्या महिलांना गळ्यातील मंगळसुत्र काढालया लावणाऱ्या अधिकाऱ्याला जोड्याने मारा, अशी शब्दांत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेचा समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करू, असे यापूर्वीच जाहीर केले आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा, ग्रामीण, उपजिल्हा आणि महिला रुग्णालयांमध्ये पूर्वी मोफत किंवा अत्यल्प दरात मिळणाऱ्या काही सेवांवर आता शुल्क आकारण्याचा निर्णय हा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट दरोडा नाही का?, असा सवाल काँग्रेसने केला आहे. खाजगी रुग्णालयांचे प्रचंड बिल, औषधांचे वाढते दर, महागाईचा भडका या सगळ्यात गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस आधीच अडचणीत आहे. सरकारी रुग्णालय हा त्याचा शेवटचा आधार. आणि तोही आता शुल्काच्या जाळ्यात? आरोग्यसेवा ही सुविधा नाही, ती मूलभूत हक्क आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करून समाजातील वंचित, गरीब, मध्यमवर्गीयांना न्याय द्यायला हवा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी परीक्षा केंद्रात जाणाऱ्या महिलांना गळ्यातील मंगळसुत्रही काढायला लावण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराचा छत्रपती संभाजीनगरमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरून माजी आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा पार पडत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये एका संतापजनक प्रकारामुळे मोठा गदारोळ पाहायला मिळाला. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी महिलांना चक्क त्यांचं 'सौभाग्याचं लेणं' म्हणजेच मंगळसूत्र काढून ठेवण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून माजी आमदार अंबादास दानवे यांनी फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे परंपरेनुसार विधीवत व आदरपूर्वक विसर्जन करण्यात आले.
राष्ट्रवादी परिवारातर्फे काश्मीर ते कन्याकुमारी अशी काढण्यात आलेली स्व. अजितदादा पवार यांची देशव्यापी ‘अस्थि-कलश यात्रा’ विधीवतरीत्या पूर्णत्वास गेली.
हरिद्वार येथून प्रारंभ झालेल्या या राष्ट्रव्यापी यात्रेचा समारोप प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.
जय पवार यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर विधीवत विसर्जन.
EVM मशीन हॅाटेलवर आढळून आल्याने या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली गेल्याचे समजते आहे संबंधितांवर कारवाई होणार
मुलाला मतदान EVM मशीनचे बटन दाबायला लावणे चुकीचे असून संबंधित मतदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटीलांचे चुलत भाऊ अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होणार
पनवेल ते शिडून टोल नाक्यावर दोन किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, एवढी प्रचंड वाहतूक कोंडी असतानाही टोल वसुली सुरूच ठेवल्याने नागरीकांमध्ये संताप पाहायला मिळतोय. वेळे लागत असल्याने. अडकलेली वाहतूक आणि टोल प्रशासनाची भूमिका यामुळे वातावरण तापलेले आहे.
मुंबईच्या भाजपच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी ‘बांगलादेशमुक्त मुंबई’ अशी घोषणा केली आहे. बांगलादेशी रोहिग्यांना आता यापुढे मुंबईत बसू देणार नाही, मुंबईचा रंग भगवाच राहील, असे विधान केले आहे. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. भारत सरकारने हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपयांची मदत केली आहे. बांगलादेशला हे पैसे कशासाठी दिले आहेत, असा सवाल राऊत यांनी केला.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावं, अशी अजितदादांचं स्वप्न होतं. ते पहिलं पूर्ण झालं पाहिजे. महाराष्ट्राची ताकद वाढविण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्रपणे सगळं सुरू होईल, हे आमच्यासमोर बोलणं झालं होतं.
तेलंगणात महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्र पाठविले आहे. यातील संशयित आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.
बाहेरून आलेले लोक छोटी-छोटी काम करून समाजात मिसळतात. पण हिंदूंनी छोटी छोटी कामे करणं सोडून दिले आहे. शेतीच्या कामाला मोल आले तर रोजगार वाढेल. रिकामं डोकं सैतानाचं घर बनतं, त्यामुळे हाताला काम पाहिजे. काम नसेल तर तरुण नक्षलवादाकडे वळतील, असा धोक्याचा इशाराही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मुळशी तालुक्यात 63.93 टक्के मतदान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मुळशी तालुक्यात मुख्य लढत आहे.
बईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका ऋतू तावडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, भाजपकडे ओरिजनल असे काही नाही, रितू तावडे या मूळच्या काँग्रेसच्या आहेत.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सरासरी ६९ टक्के मतदान झाले असून, २०१७ च्या तुलनेत फक्त १.११ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यात यावेळी मतदानात लक्षणीय घट झाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. त्या म्हणल्या, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक - २०२६ या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत केल्याबद्दल सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार.
'अमेरिकेशी केलेला व्यापार करार हा सरळ राष्ट्रद्रोह आहे. 15 आागस्ट 1947 च्या मध्यरात्री देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पंडित नेहरू यांनी भारतवर्षाला सार्वभौम व सुखी ठेवणारा ‘नियतीशी करार’ केला. मोदी यांनी हा करार मोडून भारताला अमेरिकेचे गुलाम केले', अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानले.
ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार शरद पवार हे येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार साहेबांची मानसिकता आता थांबायला पाहिजे अशी असल्याचं म्हटलं होतं. राऊतांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "संजय राऊत यांनी मविआच्या अनुषंगाने जे वक्तव्य केलंय, त्याबाबत बैठकीत चर्चा केली जाईल. मात्र, मुळात असं आहे की, शरद पवारांची पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? याबाबत राऊतांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता, असं सपकाळ म्हणाले.
अजित पवारांच्या निधनानंतर ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्या 10 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
राजस्थानच्या कोटा शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेली एक इमारत कोसळून आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान सुरू असताना नाधवडे येथील एका मतदान केंद्रावर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी करत एका मतदाराने मतदान केल्यानंतर ईव्हीएम जमीनीवर आपटून फोडल्याची घडना घडली.
राज्यभरातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलं आहे. उद्या 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. अशातच निकालाआधीच राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिकेतील यशाप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्येही महायुतीला यश मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.