PM Narendra Modi Sarkarnama
महाराष्ट्र

ZP Panchayat Samiti Election Result LIVE : पंतप्रधान मोदींचं झेडपी अन् पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील महायुतीच्या दणदणीत विजयानंतर ट्विट, म्हणाले..

ZP panchyat samati Elections Result 2026 : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यासह राज्य आणि देशभरातील घडामोडी एकाच क्लिकवर जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

पंतप्रधान मोदींचं झेडपी अन् पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील महायुतीच्या दणदणीत विजयानंतर ट्विट, म्हणाले..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमधील महायुतीच्या विजयानंतर ट्विट केलं आहे. त्यात पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे! महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला असल्याचं म्हटलं आहे.

तसेच त्यांनी ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे युतीचे सरकार हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींचे आभार मानले आहेत. याचवेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या ठोस कामगिरीबद्दल तसेच एनडीएच्या सुशासनाच्या दृष्टिकोनाबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवत, स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं अभिनंदनही केलं आहे.

शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूनबाईंना पराभवाचा धक्का

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूनबाई श्वेता थोरवे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. वेणगाव गणातून त्यांचा पराभव झाला.त्यांच्या पराभवामुळे थोरवे यांच्या वर्चस्वालाच धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

भाजपकडून स्वीकृत नगरसेवक कोण होणार? चंद्रकांत पाटील स्पष्टचं बोलले, अनेकांचं वाढलं टेन्शन

पुण्यात भाजपकडून कोणाच्या गळ्यात स्विकृत नगरसेवकाची माळ पडणार याची उत्सुकता असतानाच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी एक बॉम्ब टाकला आहे. ते म्हणाले, "भाजपचे स्पष्ट धोरण आहे की, महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या कोणत्याही उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार नाही. स्वीकृत सदस्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी नव्हे, तर केवळ अडीच वर्षांसाठी केली जाणार आहे. यामुळे सुमारे १४ कार्यकर्त्यांना ही संधी मिळेल.

प्राधान्य मात्र अशा कार्यकर्त्यांना दिले जाईल ज्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती आणि जे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी संघटनात्मक काम करत आहेत." या घोषणेमुळे निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या काही नेत्यांना मोठा धक्का बसला आहे, जे स्वीकृत सदस्यत्वाच्या माध्यमातून पुन्हा सभागृहात येण्याची शक्यता पाहत होते. भाजपकडून स्वीकृत नगरसेवक कोण होणार? चंद्रकांत पाटील स्पष्टचं बोलले, अनेकांचे टेन्शन वाढले

कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डंका! ठरला क्रमांक एकचा पक्ष

कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने घवघवीत यश संपादन केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबरचा झालेला आहे. हे यश दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यांना आम्ही समर्पित करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे.

मुश्रीफांसोबत जाण्याची तयारी? सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत दिले सूचक संकेत

काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची दोस्ती राजकारणाच्या पलीकडे आहे हे राज्याला सर्वश्रुत आहे. महायुतीमुळे दोघांच्या मैत्रीत दरार आला असला तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 20 जागा घेतल्या आहेत तर त्या पाठोपाठ काँग्रेसने 15जागा मिळवले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणार का? ची उलट सुलट चर्चा सुरू आहे. मात्र काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा करत सूचक संकेत दिले आहेत.

हाय होल्टेज लढतीत माजी जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने यांचा पराभव

रत्नागिरी - जिल्ह्याचं लक्ष लागून राहीलेल्या संगमेश्वर कोसूंब जिल्हापरिषद गटात भाजपचे प्रमोद अधवटराव विजयी

हाय होल्टेज लढतीत माजी जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने यांचा अधवटराव यांना 2600 मतांनी केला पराभव

कोसूंब गटात शिवसेनेचा पराभव नाही तर जनतेने नाकारलेल्या उमेदवाराचा पराभव

भाजपने या मतदार संघावर भाजपने दावा केला होता मात्र सीट न मिळाल्याने मैत्रीपुर्ण लढत

जनतेला आता घराणेशाही नको झालीय घराणे शाहीला फाटा देणारे निर्णय या तालुक्याने घेतलेत

रायगडमध्ये शेकापची मोठी पिछेहाट, 49 जागांचे निकाल जाहिर मात्र शेकाप शुन्यात

रायगड जिल्हा परिषदेवर काही वर्षापुर्वी सत्ता गाजावणाऱ्या शेकापची पिछेहाट होताना दिसत आहे. आत्ता पर्यंत 59 जागांपैकी 49 जागांचे निकाल हाती आले. यामध्ये शिंदे सेनेला 16, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 16, भाजप 11, ठाकरे गटाला 5 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. अजुनही 10 जागांचे निकाल हाती येण बाकी आहे. मात्र हाती आलेल्या या निकालात ठाकरे गटाने 5 तर काँग्रेस ने 1 जागा मिळवून खात खोलल असून शेकापने अद्याप भोपळा फोडलेला नाही. हि परिस्थिती अशीच कायम राहिली तर शेतकरी कामगार पक्षाच्या भवितव्यासाठी हे चित्र धोकादायक ठरणार असेल.

रायगड जिल्हा परिषद अपडेट

एकूण जागा - 59

जाहीर निकाल - 49

भाजप - 11

शिवसेना - 16

राष्ट्रवादी काँग्रेस - 16

शिवसेना ubt - 5

काँग्रेस - 1

शेकाप - 0

Pandharpur SKP Win : सांगोला पंचायत समितीवर शेकापचा झेंडा

सांगोला पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सांगोला विकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. पंचायत समितीच्या 14 जागांपैकी नऊ जागा जिंकून पंचायत समितीवर सत्ता मिळवली आहे. विरोधी भाजप शिवसेनेला पाच जागा मिळाल्या आहेत. पंचायत समितीवर सत्ता मिळताच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष सुरू केला आहे.

Padharpur Politics : मंगळवेढ्यात भाजपाची एक हाती सत्ता; आमदार समाधान आवताडे यांचा करिष्मा कायम

मंगळवेढा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटनसह सात पंचायत समितीच्या जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके यांच्या गटाला पंचायत समितीची केवळ एक जागा मिळाली आहे. मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीने भाजपचा पराभव केला होता. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मात्र भाजपाने नगरपालिकेच्या पराभवाचा वचपा काढला आहे. विशेष म्हणजे मंगळवेढ्यात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे यांचा या निवडणुकीमध्ये धक्कादायक पराभव झाला आहे.

कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का

सोशल मिडीयावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असणाऱ्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना भाजप उमेदावाने पराभवाचा धक्का दिला आहे. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. त्यांचा भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी 300 मतांनी पराभूत केला. हा पराभूत निर्मला नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

अब्दुल सत्तारांचे चिरंजीव विजयी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत अंभई गटातून आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल अमीर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नव्याने तयार झालेल्या अंभई गटातून अब्दुल अमीर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवत 'सत्तार फॅक्टर' कायम ठेवला असून त्यांनी भाजपचे उमेदवार त्र्यंबक मारुती गव्हाणे यांचा पराभव केला आहे. अमीर यांनी जवळपास 3435 मतांच्या फरकाने विजय मिळवला.

धाराशिव जिल्ह्यात फक्त एका मताने भाजपचा पराभव

राज्यभरातील बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल समोर येत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती निवडणुकीत एका मताने भाजपचा पराभव झाला आहे. येथे ढोकी पंचायत समितीतून ठाकरे गटाचे अमर समुद्रे विजयी झाले असून त्यांना 3187 मते मिळाली आहेत. सध्या या विजयाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

कोकणातील कोलगावमध्ये अपक्ष मायकल डिसोजा विजयी, भाजपला जोरदार धक्का

कोकणातील कोलगावमध्ये निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांनी भाजपचे उमेदवार आणि जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांचा पराभव करत विजय मिळवला. याचबरोबर पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या प्रणाली टिळवे विजयी झाल्याने भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला.

पैठण पंचायत समितीवर भूमरे पिता पुत्रांचे वर्चस्व

खासदार संदिपान भुमरे,आमदार विलास भुमरे यांचा शिवसेनेने 14 जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दोन जागावर असून भूमरेनी गड राखला

लातूर महापौर-उपमहापौरपदावर काँग्रेसची पकड; निवड बिनविरोध

लातूर महापालिकेत महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड झाली. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.

शिवसेनेचे विक्रांत भास्कर जाधव विजयी

गुहागर असगोली जिल्हा परिषद गटातून ठाकरे शिवसेनेचे विक्रांत भास्कर जाधव विजयी

रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंतांच्या स्वीय सहाय्यकाचा विजय

रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप पंचायत समिती गणात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील यांनी दमदार कामगिरी करत 400 मतांच्या फरकाने विजय मिळवला.

धाराशिव मध्ये उबाठाला विजय 

ढोकी पंचायत समिती गणातून उबाठाचे अमर समुद्रे एक मतांनी विजयी झाले आहेत. भाजपचे निहाल काझी यांचा एक मतांनी विजयी झाले आहेत.

 रायगडमध्ये विकास गोगावले विजयी 

रायगडमध्ये भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले विजयी झाले आहेत. नगरपंचायत निवडणुकीदरम्यानच्या राड्यामुळं चर्चेत आलेलं नाव. 
तळा तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा कायम. जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांसह पंचायत समितीच्या चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे. 
जिल्हा परिषद, चरई खुर्द मधून राष्ट्रवादीच्या गीता जाधव तर रहाटाड मधून नलिनी लोखंडे विजयी

बारामती

सुपा - गट

१) पल्लवी प्रमोद खेत्रे १८०९५ (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी

२) वंदना विशाल कोकरे २६७७ (भाजप) पराभूत

२) मोहिनी गणेश खैरे ३५४२ (अपक्ष) पराभूत

सुपा गण

१) उज्वला पोपट खैरे ७४६६ विजयी (भाजपा)

२) मनिषा हनुमंत चांदगुडे ४७७७ पराभूत (अपक्ष)

काऱ्हाटी गण

१) शामल वाबळे - ९५३३ विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस)

२) सोनाली प्रमोद खराडे- पराभूत (भाजप)

जिल्हा- कोल्हापूर (पंचायत समिती)

शाहूवाडी 8

भाजप - 2

काँग्रेस -2

राष्ट्रवादी -

शिवसेना -

शिवसेना ठाकरे - 1

जनसुराज्य -1

पन्हाळा 12

भाजप -

काँग्रेस - 1

राष्ट्रवादी - 2

शिवसेना

जनसुराज्य - 1

हातकंणगले 22

भाजप - 3

काँग्रेस -3

राष्ट्रवादी -2

शिवसेना

शिरोळ 14

भाजप - 3

काँग्रेस - 2

राष्ट्रवादी

शिवसेना

स्वाभिमानी - 3

करवीर 24

भाजप - 4

काँग्रेस -5

राष्ट्रवादी -3

शिवसेना-2

गगनबावडा - 4

भाजप -

काँग्रेस -4

राष्ट्रवादी

शिवसेना

राधानगरी 10

भाजप -

काँग्रेस -1

राष्ट्रवादी- 2

शिवसेना -4

कागल - 12

भाजप - 2

काँग्रेस -

राष्ट्रवादी - 6

शिवसेना- 1

भुदरगड - 8

भाजप -

काँग्रेस -2

राष्ट्रवादी

शिवसेना- 6

आजरा 4

भाजप - 2

काँग्रेस -

राष्ट्रवाद 1

शिवसेना- 2

गडहिंग्लज - 10

भाजप - 2

काँग्रेस -

राष्ट्रवादी - 6

शिवसेना

चंदगड -8

भाजप - 3

काँग्रेस -

राष्ट्रवादी - 3

शिवसेना

जनसुराज्य - 1

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागांवर विजयी

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागा, काँग्रेस 12 जागा, भाजप 7 जागा,  शिवसेना 6 जागांवर

माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्या घरातील 4 उमेदवार पराभूत झाले आहेत.

कन्नड तालुक्यातील हतनूर गटात भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर याची कन्या मीनाक्षी पवार आघाडीवर आहेत.

कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी काँग्रेसने आतापर्यंत 12 जागावर विजय दुसऱ्या क्रमांकवर राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा मिळवल्या भाजप 7,शिवसेना 6, जनसुराज्यने 4 जागा मिळवल्या ठाकरे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रत्येकी एक जागा मिळवली

पुणे जिल्हा परिषद / मावळ पंचायत समिती

मतमोजणी – फेरी क्रमांक ३ : जागानिहाय स्थिती

जागा क्र. ३० – इंदुरी जिल्हा परिषद

दामोदर पल्लवी संदीप – 1364 मते

भागवत मेघा प्रशांत – 1330 मते

NOTA – 26 मते

एकूण मते – 2720

या फेरीत दामोदर पल्लवी संदीप यांना 34 मतांची आघाडी

Zilla Parishad Election Result LIVE: बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला विजय, पल्लवी खेत्रे विजयी

सुपा (zp)

निवडणुक विभाग सुपा (zp)

वंदना विशाल कोकरे (भाजप ) - ११९८

पल्लवी प्रमोद खैरे (राष्ट्रवादी ) - ९११९

मोहिनी गणेश खैरे (अपक्ष ) - २१३५

--------------------------

निवडणुक गण सुपा

उज्ज्वला पोपट खैरे (भाजप ) - ७४६६

मनिषा हनुमंत चांदगुडे (अपक्ष ) - ४७७७

निखिल चव्हाण आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या गणोरी गटातून भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल चव्हाण आघाडीवर आहेत, इथे काँग्रेसशी त्यांची लढत होत आहे.

पुणे जिल्हा परिषद

भाजप - 15

शिवसेना - 03

राष्ट्रवादी - 21

ठाकरे गट - 01

काँग्रेस -

श गट - 02

छत्रपती संभाजीनगरच्या वडोद बाजार जिल्हा परिषद गटातून मंगेश साबळे हे विजयी झाले आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहबे दानवे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवत सव्वा लाखाहून अधिक मत मिळवली होती.

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत विजयी

पुरंदर: पुण्याच्या आमदाराची मुलगी विजयी

पुरंदर तालुक्यातील दिवे गराडे गटातून बापूसाहेब पठारे यांची मुलगी रूपाली झेंडे राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या आहेत.

राष्ट्रवादीचे दोन्ही पंचायत समिती सदस्य देखील विजयी

पुणे जिल्हा 

टाकळी हाजी जिल्हा परिषद गट

राजेंद्र गावडे - भाजप - १३२३१

दामू घोडे - राष्ट्रवादी काँग्रेस - ९८४६

डॉ सुभाष पोकळे - शिवसेना ५०६९

बाळासाहेब डांगे - शिवसेना उबाठा -४६१२

टाकळी हाजी - पंचायत समिती गण

सुनिता कड - भाजप - ७३६७

संगिता दाभाडे - राष्ट्रवादी काँग्रेस - ६२७०

निचित- शिवसेना - २०९४

शेलार - शिवसेना उबाठा - ८७०

कवठे येमाई - पंचायत समिती गण

कांचन सांडभोर - भाजप - ६०८३

माधुरी थोरात - शिवसेना - ४९९२

शिल्पा थोरात - राष्ट्रवादी काँग्रेस - २३१७

जयश्री लंघे - शिवसेना उबाठा -३१५९

सांगली - कुंडल पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या हेमा सुरेश पवार १८३१ मतांनी विजयी

कोल्हापुरातील पहिला निकाल हाती

घुणकी, येथे काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार जिल्हा परिषद साठी विजयी

पंचायत समिती नवे पारगाव मध्ये काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयी

तर घुणकी पंचायत समिती जनसुराज्यच्या कल्याणी राजवर्धन मोहिते विजयी

नवे पारगाव पंचायत समिती काँग्रेसचे भारत पाटील विजयी

गडहिंग्लज

गडहिंग्लज तालुक्यातील नूल जिल्हा परिषद मतदारसंघात अनिरुद्ध रेडेकर विजयी

आजरा

उत्तूर पंचायत समितीमधून राष्ट्रवादीचे विकास चोथे विजयी

जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शिरीष देसाई आघाडीवर

पन्हाळा

सातवे पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या भारती पाटील विजयी

दौंड तालुका

वरवंड-पारगाव गट : राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार 400 ने आघाडीवर. जिल्हा परिषद उमेदवार गायत्री खळदकर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती उमेदवार मनीषा ताकवणे आघाडीवर

राहू - खामगाव गटात : भाजप चे उमेदवार आघाडीवर.

खडकी - देऊळगाव राजे गटात : राष्ट्रवादी चे जगदाळे आघाडीवर.

भाजपचे उमेदवार संदीप पुजारी हे पहिल्या फेरीअखेर आघाडीवर..

शिरोळ तालुका

उदगाव जिल्हा परिषद

भाजपचे उमेदवार संदीप पुजारी हे पहिल्या फेरीअखेर आघाडीवर..

यड्राव जिल्हा परिषद

भाजपच्या उमेदवार संजना पुजारी पहिल्या फेरीअखेर आघाडीवर..

नांदणी जिल्हा परिषद

राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवार प्राचीता चंद्रकांत कोळी यांना पहिल्या फेरी अखेर आघाडीवर..

आलास जिल्हा परिषद

मतसंघातील भाजपचे उमेदवार प्रशांत शहापुरे हे पहिल्या फेरीअखेर आघाडीवर

दत्तवाड जिल्हा परिषद

राधा उर्फ दिपाली पाटील या पहिल्या फेरीअखेर १३५ मतांनी आघाडीवर आहेत.

अब्दुल लाट जिल्हा परिषद

श्रद्धा अविनाश गायकवाड या 437 मतांनी आघाडीवर आहेत.

वेळू गनातून भारतीय जनता पार्टीचे माऊली पांगारे विजय

कोल्हापुरातील पहिला निकाल हाती

घुणकी, येथे काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या जिल्हा परिषदेसाठी विजयी

पंचायत समिती नवे पारगाव मध्ये काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयी

तर घुणकी पंचायत समिती काँग्रेसचया संगीता संग्राम पाठील विजयी

मावळ पंचायत समिती

पोस्टल मतमोजणीला सुरुवात... पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने उघडले खाते आहे. माढा तालुक्यातील भोसरे गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अश्विनी दळवी विजयी झाल्या आहेत. भोसरे गट आणि गणातील सर्व जागा राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आल्या आहेत.

कोल्हापूर

जिल्हा परिषद- कोल्हापूर

एकूण जागा - 68

कल

भाजप - 3

शिवसेना (शिंदे) - 2

राष्ट्रवादी - 5

काँग्रेस - 5

शिवसेना (ठाकरे) -

जनसुराज्य - 3

इतर -

रायगड ः भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी


63 / 8 
भाजप :   04
शिवसेना :   02
शिवसेना UBT:   01
NCP :  01
काँग्रेस :   00
वंचित :    00
MIM:  00
अपक्ष :00

जिल्हा परिषद- कोल्हापूर

एकूण जागा - 68

कल -

भाजप - 1

शिवसेना (शिंदे) -

राष्ट्रवादी (अजित पवार) -

कॅांग्रेस - 03

शिवसेना (ठाकरे) -

राष्ट्रवादी (शरद पवार)

जनसुराज्य - 1

इतर -

पंचायत समिती - (पंचायत समितीचे नाव)

एकूण जागा - 136

कल किंवा निकाल - (किती जागांचा)

भाजप -2

शिवसेना (शिंदे) -

राष्ट्रवादी (अजित पवार) -

कॅांग्रेस - 06

शिवसेना (ठाकरे) -

राष्ट्रवादी (शरद पवार)

जनसुराज्य -

इतर -

पुणे-दिलीप वळसे पाटील यांच्या पुतण्या विवेक वळसे आघाडीवर 

 अजित पवार त्यांच्या तेराव्याचा विधी

जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच आज अजित पवार त्यांच्या तेराव्याचा विधी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील पवार फार्म या निवासस्थानी पार पडत आहे. संपूर्ण पवार कुटुंब नातेवाईक या ठिकाणी या विधीसाठी दाखल झाले आहेत.

महायुतीचे 27 उमेदवार बिनविरोध विजयी

Maharashtra ZP Election Results 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी (7 फेब्रुवारी) रोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज (ता. 09) जाहीर होणार आहे. या निकालाकडे उमेदवारांसह राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच महायुतीचे 27 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कोकणात महायुतीचे 27 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत.

कोल्हापूर झेडपी आणि 12 पंचायत समित्यांच्या मतमोजणीला 10 पासून सुरूवात होणार

Kolhapur ZP Election Result : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 12 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी 74.45 टक्के मतदान झाले आहे.

बारामतीतील निकालाकडे सर्वांच्या नजरा

अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तर अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीमधील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणाच्या मतमोजणीत कोण विजयी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ZP Panchayat Samiti Election Result LIVE : जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींचे निकाल आज जाहीर होणार

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे उमेदवारांसह राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. तर सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT