Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Updates : खासदार लंकेंनी केंद्रीय मंत्री आठवलेंची घेतली भेट

Maharashtra Political Live updates : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे निकाल जाहीर झाले असून सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. यासह आज 11 फेब्रुवारीच्या राज्य आणि देशभरातील घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

Ramdas Athawale And Nilesh Lanke : खासदार लंकेंनी केंद्रीय मंत्री आठवलेंची घेतली भेट

अहिल्यानगर मतदारसंघातील बौद्ध समाजाच्या दीर्घकालीन धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी नवी दिल्ली इथं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. या भेटीत मतदारसंघातील बौद्ध विहार मंजुरीच्या विषयावर सविस्तर, सकारात्मक आणि आशादायी चर्चा झाली.

भाजपच्या नेत्यांवर शंभूराज देसाईंचा हल्लाबोल

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालानंतर पाटणमध्ये विजय सभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी सूचक वक्तव्य केलं.“निवडणुकीत पाटणमध्ये मोठे नेते आले, भाषणं झाली… पण जिल्हा परिषदेचा निकाल बघा.एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना तर दुसरीकडे भाजप बेरीज काय झाली अति तिथे माती होते… अति जाऊन कुठे केलं तर माणसं योग्य वेळेची योग्य संधीची वाट बघत असतात,”असं म्हणत देसाईंनी भाजपवर निशाणा साधला.

मुंबई महापौर-उपमहापौर पदासाठी आज निवडणूक

ZP Election: उमेश पाटील- सचिन जाधव यांच्यात शाब्दीक युद्ध सुरु

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालानंतर मोहोळ तालुक्यातील भाजप राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. जिल्हा परिषद व पंचायत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा दारुण पराभव केलेले भाजपचे सचिन जाधव यांच्यात शाब्दीक युद्ध सुरु आहे.

शेतकरी आत्महत्यांसाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना

राज्यात शेतकरी आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारकडून कृषी विभागाद्वारे राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. हा टास्क फोर्स आत्महत्येस कारणीभूत घटकांचा अभ्यास करणार आहे.

Latur Mayor: लातूर महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता

लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे, महापौर पदी जयश्री सोनकांबळे, तर उपमहापौरपदी ॲड स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली , लातूर महापालिकेवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने बाजी मारत मनपावर एकहाती सत्ता प्रस्थापित केली.

साताऱ्यात राष्ट्रवादी-शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली करण्यात आल्या आहेत. मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.

भाजप अ‍ॅक्शनमध्ये, पुण्यात 69 जणांचे निलंबन

पुणे महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेते,पदाधिकाऱ्यांवर भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी असे पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 69 जणांची यादी तयार केली असून त्यांच्यावर तब्बल सहा वर्षांचा निलंबन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीत दाखल झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याची चर्चा आहे.

शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवार यांच्यावर उपचार सुरु होतो. त्यांना डाॅक्टरांनी 5 दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार ते उपचार घेत आहेत. त्यांना श्वास घेण्यास आणि बोलण्यास त्रास होत होता. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT